मुक्तपीठ टीम
देशभरात काही ठिकाणी रामनवमीला झाला तसाच राजधानी दिल्लीतही हनुमान जयंतीला हिंसाचार झाला. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्ती आयोजित मिरवणुकीदरम्यान दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड, जाळफोळ करण्यात आली. या दंगलीत पोलीसही जखमी झाले. या प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त करतानाच दंगलीचा निषेध करतानाच केंद्राला दिल्ली पोलीस त्यांची जबाबदारी असल्याची आठवण करून दिली आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून केजरीवाल आणि भाजपा आमने-सामने आले आहेत.
केंद्राने दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे!
- केजरीवाल यांनी ट्विट करत ‘सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
- दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीची घटना अत्यंत निंदनीय आहे.
- या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
- पुढे त्यांनी सुरक्षेची जबाबदारी केंद्राची असल्याची आठवण करून दिली आरे.
- दिल्लीची सुरक्षा केंद्राच्या हातात असल्याचं म्हटले आहे.
- केजरीवाल म्हणाले की, ‘दिल्लीतील यंत्रणा, पोलीस यांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.
- त्यामुळे केंद्र सरकारने दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे.’
या दंगलीला केजरीवाल जबाबदार, भाजपाचा आरोप!
- दरम्यान, दिल्लीचे भाजप प्रदेश सरचिटणीस कुलजित वहल यांनी केजरीवालांवर आरोप केले आहेत.
- त्यांनी म्हटलं की, ‘या दंगलीमागे केजरीवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा हात आहे.
- त्यांनी दिल्लीतील परिस्थिती बिघडवली.
- याला केजरीवाल जबाबदार आहेत.’