मुक्तपीठ टीम
रेल्वेच्या एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तीनऐवजी चार पर्याय मिळतील. आतापर्यंत फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी कोच राजधानी व इतर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये बसविण्यात आले आहेत. लवकरच या गाड्यांमध्ये इकॉनॉमी एसी क्लास कोच जोडले जातील.
एकोनॉमी क्लासचे एसी कोच
• या नवीन श्रेणीच्या कोचसाठी कोड ठरविण्यात आला आहे.
• लवकरच प्रवाशांना यात प्रवास करण्याची सुविधा मिळेल. आरक्षणासाठी ते इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर, मोबाईल फोन अॅपवर आणि आरक्षित चार्टवर ३ ई कोडद्वारे सूचित केले जाईल.
• त्याचवेळी, कोचच्या बाहेरील भागावर त्याची ओळख होण्यासाठी एम असे लिहिले जाईल.
• प्रथम एसी कोचवर एच, दुसर्या एसी कोचवर ए आणि तिसर्या एसी कोचवर बी लिहिलेले असते.
• या कोचमध्ये अधिक प्रवासी प्रवास करू शकतील आणि त्याचे भाडेही थर्ड एसीपेक्षा कमी असेल.
• हा कोच अत्याधुनिक सुविधायुक्त आहे.
नवे एसी कोच कोचांची कपूरथळ्यात निर्मिती
• हे कोच रेल कोच फॅक्टरी (आरसीएफ) कपूरथळा येथे तयार केले जात आहेत.
• मागील महिन्यात १५ कोचचा एक रॅक तयार करण्यात आला आहे.
• हे उत्तर पश्चिम रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला पाठविण्यात आले आहेत.
• या आर्थिक वर्षाच्या अखेरीस २४८ कोच बनविण्याचे लक्ष्य आहे.
कमी खर्चात नवीन सुविधा
• खास गाड्यांमध्ये इकॉनॉमी एसी क्लासचे डबे बसविण्यात येतील
• आरक्षणासाठी (रिझर्वेशन) वेबसाइटवर ३-ई कोडसह सूचित केले जाईल
• इकॉनॉमी एसी कोच तयार करण्यासाठी २.७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत
• थर्ड एसी कोच तयार करण्यासाठी ३.८५ कोटी रुपये खर्च आला आहे