Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नबाव मलिकांच्या जावयाच्या घरी काहीच सापडले नाही, १८ जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी

January 14, 2021
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
samir khan

मुक्तपीठ टीम

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्जप्रकरणी अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी समीरला न्यायालयाने सोमवार १८ जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे समीरची चौकशी करण्यासाठी एनसीबीला आता चार दिवस मिळणार असून या चौकशीतून इतर काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

दरम्यान, अटकेनंतर समीरच्या वांद्रे येथील राहत्या घरासह जुहू परिसरात एनसीबीने छापे टाकले होते, या कारवाईत काहीही आक्षेपार्ह सापडले नसल्याचे सांगण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत एनसीबी कोठडीत असलेले सिनेअभिनेत्री दिया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला मोहम्मद हुसैन फर्नीचरवाला, आणि ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांच्या एनसीबी कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांनाही गुरुवारी बंदोबस्तात स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

 

गेल्या आठवड्यात एनसीबीच्या अधिकार्‍यांना एका कुरिअरविषयी माहिती मिळाली होती. या कुरिअरमधून दोनशे किलो गांजाचा साठा सापडला होता. हा गांजा अमेरिकेतून कुरिअरमधून पाठविण्यात आला होता. चौकशीअंती हा साठा वांद्रे येथे राहणारा ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांनी मागवला होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी एनसीबीने समन्स पाठविले होते. चौकशीत करण हा गांजा त्यानेच कुरिअरमधून मागविल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ड्रग्जप्रकरणी एनसीबीने गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यानंतर सिनेअभिनेत्री दिया मिर्झा हिची माजी मॅनेजर राहिला मोहम्मद हुसैन फर्नीचरवाला, तिची बहिण शायस्ता मोहम्मद हुसैन फर्निचरवाला यांचीही चौकशी झाली होती. या चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे या तिघांनाही शनिवारी एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी राहिला आणि करणला गुरुवार १४ जानेवारीपर्यंत एनसबी कोठडी सुनावण्यात आली.  तर शायस्ताला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. तिच्या वतीने तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन तिची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती. या तिघांच्या अटकेनंतर मुच्छड पानवाला म्हणून परिचित असलेल्या रामकुमार तिवारीला या अधिकार्‍यांनी अटक केली होती. त्याची न्यायालयीन कोठडीनंतर मंगळवारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यानंतर याच गुन्ह्यांत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांचे नाव समोर आले होते.

 

त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स एनसीबीकडून बजाविण्यात आले होते. या समन्सनंतर समीर हे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना या गुन्ह्यांत एनसीबीने अटक केली. अटकेनंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना सोमवार १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या वांद्रे येथील घरासह जुहू परिसरात एनसीबीने छापे टाकले होते.  त्यांच्या घरातून या अधिकार्‍यांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. मात्र जुहूची कारवाई सुरु असल्याने या कारवाईचा तपशील समजू शकला नव्हता. दुसरीकडे राहिला आणि करण यांच्या एनसीबीची कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांच्या एनसीबी कोठडीत शनिवार १६ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या दोघांना आता शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 


Tags: Local Metropolitan Magistrate CourtNawab MalikNCBराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Previous Post

किमान हमी दराने खरीप पिकाच्या खरेदीत २७ टक्के वाढ

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १६ जानेवारीला स्टार्टअप्सशी संवाद

Next Post
Narendra Modi speech

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १६ जानेवारीला स्टार्टअप्सशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!