Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य सरकारच्या भोंगे बैठकीत काही ठरलंच नाही! भाजपाचा बहिष्कार, मनसे भूमिकेवर ठाम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Loudspeackers

मुक्तपीठ टीम

सोमवारी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीला सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावलं होतं. मात्र भाजपाने या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने भाजपाचे प्रतिनिधी गैरहजर होते. या बैठकीत विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, भाजपाने या बैठकीवर बहिष्कार घातला तर मनसेने आपली ३ मेच्या डेडलाइनची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर या बैठकीत समस्या सोडवण्याच्या दिशेने काहीच महत्वाचे ठरले नाही. त्यांनी पुढे केंद्राने आणि भाजपानेच मार्ग सांगावा, असे आवाहन केले.

 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याने देशाला हा निर्णय लागू!

  • वळसे पाटील यांनी सांगितले की, या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली.
  • सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये याबाबत निर्णय दिला होता. महाराष्ट्र सरकारने २०१५ ते २०१७ या कालावधीत काही शासन निर्णय काढले आहेत.
  • त्यांच्या आधारे लाऊड स्पीकर लावण्याच्या संदर्भात सर्व स्पष्टता आहे.
  • या निर्णयाच्या आधारे लाऊडस्पीकरचा वापर केला जातो.
  • मात्र काही जण म्हणत आहेत की भोंगे उतरवण्याच्या संदर्भात बोलत आहेत.
  • भोंगे उतरवण्याच्या संदर्भात राज्य सरकारला कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी म्हटले.
  • यामुळे आता या विषयावर राष्ट्रीय धोरणाचीच गरज असल्याचे ते म्हणाले.
  • त्यासाठी आता केंद्र आणि भाजपानेच मार्ग सांगावा, असेही ते म्हणाले.

राज्यभर सर्वधर्मीयांची अडचण!

  • राज्यात अनेक ठिकाणी जत्रा, भजने आणि काकड आरत्या सुरु असतात.
  • त्यामुळे सरसकट लाऊडस्पीकर काढण्याची कारवाई करण्यास अवघड होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
  • कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत आहेत.
  • सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याने देशाला हा निर्णय लागू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनसे आपल्या निर्णयावर ठाम

  • मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याऐवजी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी बैठकीत हजेरी लावली.
  • मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असून ३ मेचा अल्टिमेटम कायम असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

Tags: BJPdilip walse patilLoudspeakersmnsदिलीप वळसे पाटीलभाजपाभोंगेमनसेमहाराष्ट्र सरकारसर्वपक्षीय बैठक
Previous Post

अलर्ट! पोस्टाचं नाव वापरून बनावट वेबसाइट, यूजर्सची फसवणूक!!

Next Post

राज्यात ८४ नवे रुग्ण, ७१ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
maharashtra corona report

राज्यात ८४ नवे रुग्ण, ७१ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!