मुक्तपीठ टीम
नॉईजचे नवीन स्मार्ट वॉच लाँच झाले आहे. नॉईज एक्स-फिट हे दहा दिवसांचा बॅटरी बॅकअपसह २ हाजर ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. सध्या सर्वत्र अॅनालॉग घड्याळाऐवजी स्मार्ट घड्याळ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे लोक आरोग्यबद्दल जागरुक झाले आहेत. आणि स्मार्टवॉचमधून आरोग्य ट्रॅक करायलाही मदत होते. नॉईजचे नवीन घड्याळ आरोग्याच्या बाबतीत एक पाऊल पुढे राहायला मदत करणार आहे. हे घड्याळ केवळ स्टायलिश दिसत नाहीत तर आरोग्यावर लक्ष ठेवण्यासही खूप फायदेशीर आहेत. बजेटपासून प्रीमियम रेंजपर्यंत अनेक स्मार्ट घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल तर नॉईजचे लेटेस्ट घड्याळ तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टवॉच निर्मात्यापैकी एक असलेल्या नॉईजने एक नवीन बजेट स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. कंपनीने HRX ब्रँडसोबत भागीदारी करून नॉईज X-Fit 1 सादर केला आहे. नॉईज X-Fit 1 ला SpO2 सेन्सर, मोठा डिस्प्ले, IP68 रेटिंग आणि १० दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते.
२,९९९ रुपयात नॉईज X-Fit 1 उपलब्ध
- भारतात नवीन नॉईज X-Fit 1 ची विशेष लॉन्च किंमत २,९९९ रुपये आहे.
- त्याची मुळ किंमत ५,९९९ रुपये आहे.
- नॉईज एक्स-फिट १ स्मार्टवॉच सिल्व्हर आणि ब्लॅक मेटल कलर फ्रेममध्ये लॉन्च केले गेले आहे.
- ते व्हाइट आणि ब्लॅक सिलिकॉन स्ट्रॅप पर्यायांसह उपलब्ध आहे.
- त्याची विक्री २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.
नॉईज एक्स-फिट १ चे फिचर्स
- Noid X-Fit १ मध्ये ३६०x४०० पिक्सेल, ३५४ ppi पिक्सेल घनता आणि ८६% स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह १.५२-इंचाचा IPS थ्रू व्ह्यू डिस्प्ले आहे.
- हे घड्याळ १०० क्लाउड-आधारित कस्टमाइजेबल वॉच फेस समर्थन देते.
- घड्याळ मेटल फिनिशचे बनलेले आहे आणि त्याचे वजन फक्त 30 ग्रॅम आहे, तसेच ते 9 मिमी पातळ आहे.
आरोग्य ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसह सुसज्ज
आरोग्य-संबंधित वैशिष्ट्यांनी नॉईज चे घड्याळ सज्ज आहे. नॉईज एक्स-फिट १ २४/७ ऑप्टिकल हृदय गती सेन्सर, रक्त-ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी एक SpO2 मॉनिटर, एक स्लीप ट्रॅकर, एक स्ट्रेस मॉनिटर आणि १५ स्पोर्ट्स ट्रॅकिंग मोड उपलब्ध आहे. घड्याळाला IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंग देखील मिळाली आहे. घड्याळाला २१०mAh बॅटरी मिळते. १० दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह हे घड्याळ उपलब्ध आहे असा कंपनीचा दावा आहे.