मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसर्या लाटेत गंगेत मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळल्याच्या बातम्यांनी खळबळ माजली होती. गंगेच्या प्रवाहात मृतदेह फेकले जात असतात, पण कोरोना संकट काळात खूपच जास्त मृतदेह आढळल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं लखनौतील संस्थेला गंगेच्या पाण्याची विषाणू तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या अभ्यासानुसार गंगेच्या पाण्यात कोरोनाचा विषाणू आढळलेले नाहीत.
जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाद्वारे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च (आयआयटीआर), लखनऊ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यास केला गेला. गंगा नदीच्या उत्तरप्रदेश, बिहार या दोन राज्यांमधील विविध घाटांवर नमुने घेण्यात आले होते. .
गंगा नदीच्या पुढील भागातून घेतले नमुने
- कन्नौज
- उन्नाव
- कानपूर
- हमीरपूर
- अलाहाबाद
- वाराणसी
- बलिया
- बक्सर
- गाजीपूर
- पाटणा
- छपरा
अभ्यासात काय आढळले?
- गंगा नदीच्या पाण्याच्या अभ्यासाचा अधिकृत अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही.
- गोळा केलेल्या गंगेच्या पाण्याच्या कोणत्याही नमुन्यांमध्ये सार्स-सीओव्ही २ म्हणजेच कोरोना विषाणूचे अंश सापडलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- व्हायरोलॉजिकल अभ्यासासाठी पाण्याच्या नमुन्यांमधून विषाणूचे आरएनए काढले गेले.
- त्यामुळे जलाशयातील व्हायरल लोड नक्की करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करणे शक्य झाले.
कोरोना मृतदेह आढळले त्या ठिकाणी तपासणी
- पहिल्यांदा मृतदेह बक्सरच्या घाटावर गंगेमध्ये वाहताना दिसल्याच्या बातम्या आल्या.
- यामुळेच आयआयटीआर अॅनालिस्टच्या पथकाने प्रथम बक्सरकडून गंगेच्या पाण्याचे नमुना घेतले.
- बक्सरबरोबरच पथकाने पाटणा, भोजपूर आणि सारण येथूनही नमुने घेतले आहेत.
- बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील गंगेच्या पाण्यातील बदलांची चौकशी करीत आहे.
- हे प्रकरण विषाणूशी संबंधित आहे, म्हणून हे काम आयआयटीआरला देण्यात आले आहे.
गंगा घाटांवरील पाण्याची तपासणी
- आयआयटीआरची तीन सदस्यांची टीम बिहारमध्ये गंगाच्या पाण्याचे नमुने घेण्यासाठी आली होती.
- बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकासह पथकाने विविध जिल्ह्यांमधील गंगा घाटांवर जाऊन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नमुने गोळा केले.
- या पथकाने १ जूनला बक्सरमध्ये गंगेच्या पाण्याचे नमुने आणि ५ जून रोजी पाटणा, भोजपूर आणि सारण येथे घेतले.
- नमुने तपासल्यानंतर गंगेच्या पाण्यात कोरोना विषाणू आहे की नाही ते तज्ज्ञांनी तपासले.
हे ही वाचा :
कोरोना मृतदेहांमुळे गंगा संसर्गित तर झाली नाही? केंद्र सरकारने नेमली समिती