Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटीचे पगार रखडलेलेच! धुळ्यात एकाची आत्महत्या!! आता ३ सप्टेंबरपर्यंत पगार देण्याचे न्यायालयाचे आदेश!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ST Bus

मुक्तपीठ टीम

ऑगस्ट संपत आला. इतर सरकारी कर्मचाऱ्यांना त्या पगाराचे वेध लागले असताना एसटी कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन रखडले आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त एसटी कर्मचारी संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. औद्योगिक न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत सर्व एसटी कामगारांचे वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यातील साक्री आगारातील एसटी कर्मचारी कमलेश बेडसे ही बातमी ऐकायला थांबले नाहीत. त्यांनी तुटपुंजा वेळेवर न मिळणारा पगार, कर्जाचा डोंगर यामुळे शुक्रवा्री स्वत:ला संपवले, अशी बातमी टीव्ही माध्यमांमध्ये आल्याने एसटी कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत.

 

औद्योगिक न्यायालयाची तंबी, ३ सप्टेंबरपूर्वी वेतन द्याच द्या!

  • एसटी कामगारांचे वेतन गेली काही वर्षे सतत वेळेवर होत नाही.
  • अनेक महिने ते रखडून ठेवले जाते.
  • त्यासाठी एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण दिले जाते.
  • मात्र, कोरोना संकटातही कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मुंबईसारख्या शहरातही राबवले गेले.
  • एसटी कर्मचाऱ्यांना दर महीन्याच्या सात तारखेपर्यंत वेतन देण्याचे प्रशासनाने मागे मान्यही केले.
  • तरीही मागील काही महिन्यांपासून कामगारांना वेळेवर मिळत नाही.
  • १९३६च्या वेतन प्रदान अधिनियमानुसार किमान १० तारखेपर्यंत मासिक वेतन देण्याची तरतूद आहे.
  • तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने २३ ऑगस्टला मुंबईच्या औद्योगिक न्यायालयात कामगार संघटनेच्या वतीने दावा दखल करण्यात आला होता.
  • औद्योगिक न्यायालयाने एसटी महामंडळाला ३ सप्टेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे आदेश दिले आहेत.

 

एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

  • धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एसटी महामंडळात कमलेश बेडसे काही वर्षांपासून काम करत आहेत.
  • अतिशय तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसल्यामुळे बेडसे काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होते.
  • तसेच त्यांच्यावर कर्जदेखील वाढल्याने ते नैराश्यात गेले होते.
  • शेवटी तुटपुंज्या पगारामुळे घरातील आर्थिक स्थिती खालावत गेल्यामुळे त्यांनी शुक्रवारी आत्महत्या केली, अशी बातमी टीव्ही माध्यमांमध्ये आली आहे.
  • न्यायालयाचा पगार देण्याचा निर्णय ऐकण्याचीही त्यांनी वाट पाहिली नाही.
  • यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी हक्काचा पगार वेळेवर न मिळणेच झालंय ‘नियमित’! पाहा याआधीचे तुळशीदास भोईटे यांचे #सरळस्पष्ट भाष्य:


Tags: Anil ParabDhulemsrtcmumbaiएसटीएसटी महामंडळधुळे
Previous Post

भारतीय क्रीडा प्राधिकरणात २२० जागांसाठी भरती

Next Post

राज्यात २४ तासात ४ हजार ६५४ नवे रुग्ण, ३ हजार ३०१ बरे होऊन घरी!

Next Post
corona

राज्यात २४ तासात ४ हजार ६५४ नवे रुग्ण, ३ हजार ३०१ बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!