मुक्तपीठ टीम
आजचा दिवस राज्यातील सत्ताधारी आघाडीसाठी न्यायालयातून चांगल्या बातम्यांचा आहे. विक्रांत युद्धनौकेला वाचवण्यासाठी जमवलेला निधी घोटाळाप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस ठरवलं तर कधीही अटक करु शकतात. त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी निकाल अपेक्षित आहे. दुसरीकडे अॅड. गुणवंत सदावर्ते यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. १३ एप्रिलपर्यंत सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ते आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणातील आरोपी आहेत. धक्कादायक बाब अशी की, सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून एक कोटीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचा आरोप पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्याचे वाटे कोणाला गेले त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा!
- शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे.
- त्यांनी विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमवल्याचा आरोप केला आहे.
- माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
- त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला आहे.
- त्यात आज न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी आहे.
संजय राऊत यांनी केलं होतं ट्वीट…”सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल”
- आयएनएस विक्रांतच्या नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला, देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल.
- किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे.
- लोकांनी आता गप्प बसू नये.
- जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचाराच लागेल.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंची कोठडी वाढली!
- एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला.
- राज्यातील इतक्या मोठ्या नेत्याच्या घरावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली.
- पोलिसांनी या प्रकरणी १०९ कर्मचारी आणि अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली.
- न्यायालयाने पहिल्याच तारखेला कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
- दोन दिवसात पोलीस तपासात आणखी काही महत्वाची माहिती आणि काहींची नावे समोर आली.
- पोलिसांनी ती माहिती न्यायालयात सादर केल्यानंतर आज गुणरत्न सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली.
सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांकडून एक कोटीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचा आरोप
- धक्कादायक बाब अशी की, आजवर कर्मचाऱ्यांकडून पैसे न घेतल्याचे सांगणाऱ्या सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून एक कोटीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचं पोलिसांनी मांडलं.
- त्याचे वाटे कोणाला गेले त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
- तसंच नागपूरहून आलेला एक फोन कुणाचा त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
- सातारा पोलिसांनी समाजात विद्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात सदावर्तेंची कोठडी मागत आहेत.