Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता राजकीय पक्षांना रोखीनं फक्त २ हजारच घेता येणार! निवडणूक आयोगाची शिफारस!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
ec (2)

मुक्तपीठ टीम

आता राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधी आणि देणग्यांवर आळा बसणार आहे. नगदी स्वरूपात स्वीकारण्यात येणाऱ्या निधीची रक्कम ही २० हजारांहून कमी करून २ हजार रुपये आणि एकूण निधी आणि देणग्या स्वीकारण्याची रक्कम ही २० कोटी करण्यात यावा असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने मांडला आहे. निवडणुकीसाठी देण्यात येणाऱ्या देणग्या या काळ्या पैशांपासून मुक्त व्हाव्यात हा त्या मागचा उद्देश आहे.

राजीव कुमार यांनी पत्र लिहून केली शिफारस!!

  • सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्यात काही सुधारणांची शिफारस केली आहे.
  • राजीव कुमार यांनी सांगितले की, आयोगाच्या शिफारशींचा उद्देश राजकीय पक्षांना देणगी देण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे आणि पारदर्शकता आणणे आहे.
  • आयोगाने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा आयोगाने नुकतेच अशा २८४ पक्षांना नोंदणीकृत यादीतून काढून टाकले आहे, जे नियमांचे पालन करत नव्हते.
  • आयकर विभागाने नुकतेच करचुकवेगिरीच्या आरोपाखाली अशा अनेक राजकीय युनिट्सच्या जागेवर छापे टाकले होते.

निवडणूक आयोगाने केली शिफारस!!

  • निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना एकवेळ रोख देणगी देण्याची कमाल मर्यादा २० हजार रुपयांवरून दोन हजार रुपयांपर्यंत कमी करावी असा सल्ला दिला आहे.
  • सध्याच्या नियमांनुसार, राजकीय पक्षांना २० हजार रुपयांच्या वरच्या सर्व देणग्या जाहीर कराव्या लागतात आणि आयोगाला कळवाव्या लागतात.
  • आयोगाच्या या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाची मान्यता मिळाल्यास दोन हजार रुपयांच्या वरच्या सर्व देणग्या राजकीय पक्षांना कळवाव्या लागतील, त्यामुळे पारदर्शकता वाढेल.
  • कोणत्याही राजकीय पक्षाला मिळणाऱ्या एकूण देणग्यांपैकी जास्तीत जास्त २० टक्के किंवा २० कोटी रुपये असावी, अशी शिफारसही आयोगाने केली आहे.
  • निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे आणि या खात्यातून सर्व व्यवहार व्हावेत आणि निवडणूक खर्चाच्या तपशिलात ही माहिती द्यावी, अशीही निवडणूक आयोगाची इच्छा आहे.

Tags: ECElections FundingKiran RijujuRajiv Kumarकिरेन रिजिजूकेंद्र सरकारनिवडणूक आयोगराजीव कुमार
Previous Post

महाराष्ट्रात राष्ट्रीय सर्पविष पेढी आणि परीक्षण केंद्र निर्माण करणार: सुधीर मुनगंटीवार

Next Post

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण

Next Post
Mumbai Coastal Road Project

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!