Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बीडीडी चाळीतील लोकांची घरे झाली नाही, पण त्याआधीच त्यांच्या वस्त्यांची नावं मात्र ठरली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bdd chawll worli, nm joshi, wadala

मुक्तपीठ टीम

मुंबईतील वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींची नाव बदलण्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली. वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आल्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर पत्राचाळीचेही सिद्धार्थनगर असे नामांतर करण्यात येणार, असेही आव्हाड यांनी जाहीर केलं. या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले असून येत्या तीन महिन्यात कामाठीपुराचा विकास प्रकल्प सुरु हाणार असल्याची घोषणा आव्हाडांनी केली.आव्हाडांच्या या नामकरण घोषणांमुळे आता बीडीडी चाळीतील लोकांची घरे झाली नाही, पण त्याआधीच त्यांच्या वस्त्यांची नावं मात्र ठरली, असा टीकेचा सूर उमटू लागला आहे.

 

कामाठीपुराचा विकास प्रकल्प येत्या तीन महिन्यात सुरु होणार…

  • मुंबईतील ५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे, म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळीचा पुर्नविकास या आणि अशा अनेक विषयांबाबत विधानसभा सभागृहात नियम २९३ अन्वये चर्चा करण्यात आली.
  • या चर्चेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले.
  • ते म्हणाले की, मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत.
  • बीडीडी चाळीचा पुर्नविकास कार्यान्वित झालेला आहे.
  • त्यामुळे कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल.

 

आधुनिक दर्जाची इमारत म्हाडाकडून बांधली जाणार!

  • मुंबईतील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी एक नवे वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे.
  • १९ मजल्यांची एक इमारत बांधण्यात येत आहे.
  • ताडदेव येथे ३२ कोटी खर्च करुन ९२८ महिला राहू शकतील अशी इमारत बांधण्यात येत आहे.
  • तसेच म्हाडा कार्यालयाच्या वांद्रे येथील इमारतीचा पुर्नविकास करुन आधुनिक दर्जाची इमारत बांधली जाणार आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
  • दरम्यान, कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल.

 

सामाजिक जाणीवेतून देखील म्हाडा काम करतेय….

  • निवारा देणे हे म्हाडाचे काम असून त्यासोबतच सामाजिक जाणीवेतून देखील म्हाडा काम करत आहे.
  • परळमधील टाटा कॅन्सर रुग्णालयामधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग येथील इमारतीमधील १०० खोल्या कॅन्सरचे उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईंकासाठी दिल्या आहेत.
  • वांद्रे येथील लिलावती रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या भूखंडावर जागतिक दर्जाचे वेटरनरी (पशूवैद्यकीय) रुग्णालय बांधण्यात येईल.
  • जोगेश्वरी पश्चिम येथे म्हाडाच्या भूखंडावर मुंबईकरांसाठी एक जागतिक दर्जाचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे.
    तसेच पालघर येथे २० एकरची जागा मिळाल्यास तिथे एक चांगले वृद्धाश्रम बांधण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे.

 

तळीये गावाचा पुर्नविकास म्हाडा करणार…

  • गेल्या वर्षी महाडच्या तळीये गावात अतिवृष्टी झाली.
  • या अतिवृष्टीमुळे हे गावचं उद्धवस्त झालं.
  • त्यावेळीच तळीये गावाचा पुर्नविकास म्हाडा करेल असे जाहीर केले होते.
  • जून २०२२ पर्यंत म्हाडा तळीये गावातील लोकांना ६०० फुटांचे घर देणार आहे.

Tags: Dadar Naigaonjitendra awhadMahadMaharshtra AssemblymumbaiNM Joshi margTaliye Gaonvidhan sabhaworliगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडना. म. जोशी बीडीडी चाळनायगाव बीडीडी चाळम्हाडावरळी बीडीडी चाळ
Previous Post

सामान्यांच्या हजारो घरांचं श्रेय हरवणारी ३०० घरांची घुसखोरी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात का झाली?

Next Post

“भाजपाशी जुळवून घ्या…” भूमिका व्यर्थ…शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

Next Post
Paratap Sarnaik And ED

"भाजपाशी जुळवून घ्या..." भूमिका व्यर्थ...शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!