Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बारा न्यायाधीशांच्या नावांवर अद्याप निर्णय नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली होती शिफारस!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

बारा न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. मार्च ते सप्टेंबर दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने चार उच्च न्यायालयांना न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पुन्हा नावे पाठवली होती. उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याच्या शिफारशीवर पुनर्विचार करण्याची विनंती करून सरकारने ही नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडे परत पाठवली होती. यापैकी पाच नावे कोलकाता उच्च न्यायालयासाठी, तीन जम्मू -काश्मीर उच्च न्यायालयासाठी आणि प्रत्येकी दोन कर्नाटक आणि अलाहाबाद उच्च न्यायालयांसाठी आहेत. सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमने या बारा जणांची नावे या वर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याच्या शिफारशीसह पुन्हा पाठवली.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या ताज्या शिफारशीवरून तयार केलेल्या यादीतून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जात आहे, परंतु सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय मंडळाने पुन्हा पाठवलेल्या नावांवर सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. विहित प्रक्रियेनुसार, उच्च न्यायालय कॉलेजियम न्यायाधीश होण्यासाठी पात्र उमेदवारांची नावे कायदा मंत्रालयाकडे पाठवते.

 

मंत्रालय यात उमेदवाराबद्दल आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) अहवाल आणि इतर तपशील संलग्न करते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला ​​पाठवते. यानंतर, सर्वोच्च न्यायालय कॉलेजियम यापैकी काही नावांचा विचार करते आणि उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी सरकारला शिफारस पाठवते. संबंधित उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दोन ते चार वर्षांपूर्वी या बारा नावांची शिफारस केली होती.

 

११ ऑक्टोबर रोजी तीन वकील आणि दोन न्यायिक अधिकारी यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ९ ऑक्टोबर रोजी आठ न्यायाधीशांची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशींच्या आधारे पाच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची बदली करण्यात आली.


Tags: इंटेलिजन्स ब्युरोकेंद्र सरकारबारा न्यायाधीश नियुक्तीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

कायद्यालाही काळीज असतं…ड्रग्स प्रकरणातील आरोपीला वडिलांना किडणी देण्यासाठी दिली वैद्यकीय तपासणीची परवानगी!

Next Post

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत शरद पवारांविरोधात आपचे धनंजय शिंदे!

Next Post
sharad pawar

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत शरद पवारांविरोधात आपचे धनंजय शिंदे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!