मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव हा कमी होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात केवळ १५ हजार नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यात आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे मृतांचा आकडाही कमी होताना दिसत आहे. तसेच बरे होणाऱ्यांचेही प्रमाणही जवळ-जवळ दुपटीने वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राच्या इतर विमानतळांवरून येणाऱ्या प्रवाशांना आता कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीत सूट देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विमान प्रवाशांना आता सूट
• मुंबई मनपाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबई विमानतळावरील अधिकारी प्रवाशांवर आरटी-पीसीआर चाचणीची सक्ती करणार नाहीत.
• नवीन आदेश तातडीने अंमलात आणले गेले आहेत.
• महाराष्ट्रातल्या विमानतळांवरून मुंबईकडे येणाऱ्या सर्व प्रवाशां विमान प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीतून सूट देण्यात आली आहे.
मुंबईची वाटचाल कोरोना मुक्तीकडे…
• मुंबईत कोरोनाचे फक्त ६७६ नवीन रुग्ण आढळले आहेत.
• सोमवारी एका दिवसात ५५७० रुग्ण बरे झाले.
• मुंबईत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९४टक्क्यांवर
महाराष्ट्रातही अपवाद वगळता कोरोनाची लाट ओसरतेय…
• सोमवारी महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५,००० नवीन रुग्ण आढळले आहेत.
• त्याच वेळी, एका दिवसात ३३,००० लोक बरे झाले.
• मृत्यूचे प्रमाणही घटते आहे, ४८ तासात कोरोनामुळे १३३ जणांचा मृत्यू झाला आहे.