Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“यंदा ईडब्ल्यूएस कोटा नियमात होणार नाही बदल!”

केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रवर्ग ओळखण्यासाठी सध्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रूपये ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने माहिती दिली की, नियमांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीने सुचवले आहे की, या वर्षीच्या समुपदेशन आणि प्रवेशांसाठी सध्याचे नियम सुरू ठेवता येतील. यासोबतच केंद्र सरकारने ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या उमेदवारांना नीट अभ्यासक्रमात प्रवेश देणार असल्याचे सांगितले.

 

तसेच, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने समितीच्या अहवालाची प्रतही जोडली. केंद्र सरकारने समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये नवीन नियमांच्या अंमलबजावणीच्या शिफारशींचाही समावेश असल्याचे पुढे सांगण्यात आले. माजी वित्त सचिव अजय भूषण पांडे, सदस्य सचिव आयसीएसएसआर व्हीके मल्होत्रा ​​आणि प्रमुख आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांचा समावेश असलेल्या तिन सदस्यीय समितीने ३१ डिसेंबर रोजी केंद्राला निवेदन दिले होते.

 

मात्र, या समितीने केंद्र सरकारला सादर केलेल्या आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या वार्षिक आठ लाख रुपयांच्या उत्पन्नाचा निकष अधिक समावेशक नसल्याच्या निष्कर्षावर समिती आली आहे. या समितीच्या अहवालाचा संदर्भ देत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, न्यायालयाने किमान यावर्षी तरी याला मान्यता दिली तर, प्रवेशासाठी समुपदेशन सुरू करावे. यासह, केंद्राने असेही म्हटले आहे की, पुढील सत्रापासून ईडब्ल्यू्एसचे मापदंड बदलले जाऊ शकतात. या प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारीला होणार आहे.

 

सरकारने न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांची सुनावणी करताना कॉन्सिलिंगला स्थगिती दिली आहे, त्यामुळे आता विद्यमान अटी व शर्तींवर कॉन्सिलिंगला परवानगी द्यावी. पुढील अधिवेशनासाठी समिती योग्य ते व्यावहारिक बदल करेल. म्हणजेच ईडब्ल्यूएस कोट्याच्या मूलभूत अटींमध्ये खाजगी घर, घरगुती मालमत्ता इत्यादी मुद्द्यांचा योग्य अभ्यास करून तज्ञ समिती आपल्या शिफारशी देखील देईल.

 

केंद्र सरकारने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, ते ८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यावर उपस्थित प्रश्नांवर एक तज्ञ समिती स्थापन करेल, जी एका महिन्यात शिफारसी देईल. ३० नोव्हेंबर रोजी केंद्राने वित्त सचिव अजय भूषण पांडे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. यातील इतर सदस्य म्हणजे प्रोफेसर व्ही के मल्होत्रा, सदस्य सचिव, आयसीएसएसआर आणि सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार संजीव सान्याल आहेत.


Tags: EWS reservationSupreme Courtईडब्ल्यूएस कोटासर्वोच्च न्यायालय
Previous Post

“सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच; नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच!”

Next Post

शाश्वत सिंचनावर भर! जलसंपदा विभागानं गेल्या दोन वर्षात काय केलं?

Next Post
Jayant patil on Water Resources department performance

शाश्वत सिंचनावर भर! जलसंपदा विभागानं गेल्या दोन वर्षात काय केलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!