मुक्तपीठ टीम
जर तुम्ही जुन्या पत्त्यावर राहत नसाल किंवा तुमच्याकडे नवीन पत्त्याचा कोणताही पुरावा नसेल आणि तुम्हाला एलपीजी सिलिंडरची नोंद करायची असेल तर घाबरायची गरज नाही. अॅड्रेस प्रूफशिवाय आणि कोणत्याही प्री-बुकिंगशिवाय गॅस सिलिंडर आता सहज मिळेल. कोणत्याही सोयीच्या दुकानातून किंवा जवळच्या पेट्रोल पंपावरून ५ किलोचे एफटीएल सिलिंडर मिळवणे शक्य आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने नुकतेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ट्वीट केले की,”कोणत्याही पदार्थांच्या शौकीनांसाठी परिपूर्ण मित्र! छोटू 5KG FTL सिलेंडर आपल्या जवळच्या कोणत्याही सोयीच्या दुकानात किंवा पेट्रोल पंपावर मिळवा. प्री-बुकिंग आणि अॅड्रेस प्रूफची गरज नाही.
The perfect buddy for any foodie! Get the Chhotu 5KG FTL Cylinder at a convenience store or petrol pump near you. No pre-booking.
No address proof required. For details, visit https://t.co/8tFhQASLxC. #IndianOil #ChhotuMeraSaathi pic.twitter.com/ZSMtA7SwBO
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) October 3, 2021
छोटू 5kg FTL आहे तरी कसा?
- छोटू 5kg FTL म्हणेज ५ किलोचा मोफत व्यापार एलपीजी. आकारामुळे त्या सिलिंडरला छोटू म्हणतात.
- हा इंडियन ऑइलने आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेला एक छोटा गॅस सिलेंडर आहे.
- किराना स्टोअर, इंडियन ऑईल रिटेल आउटलेट आणि वितरकाने नियुक्त केलेल्या अधिकृत इंडेन वितरक किंवा पॉइंट ऑफ सेल्सकडून
- छोटू मिळू शकतो. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत आणि अधिक तपशीलासाठी, iocl.com वर IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतो.
छोटू गॅस सिलिंडरशी संबंधित महत्वाचे नियम आणि अटी
- ग्राहक आपल्या सोयीनुसार कोणत्याही शहरात छोटू गॅस सिलिंडर वापरू शकतात.
- ग्राहकांना वापरण्याच्या कालावधीची पर्वा न करता, प्रति सिलिंडर पाचशे रुपयाच्या निश्चित रकमेसह परत खरेदी करण्याचा पर्याय असेल.
- छोटू गॅस सिलिंडर खरेदीसाठी कोणत्याही सुरक्षा ठेवीची आवश्यकता नाही.
- ग्राहक छोट्या गॅस सिलिंडर रिफिलची होम डिलिव्हरी शुल्क भरून पॉईंट ऑफ सेलद्वारे घेऊ शकतात.
गॅस सिलिंडरचे दर
०१ ऑक्टोबर २०२१ पासून iocl.com नुसार, मेट्रो शहरांमध्ये १९ किलो सिलिंडरची किंमत खालीलप्रमाणे आहे.
- मुंबई – १६८५.००
- दिल्ली – १७३६.५०
- कोलकाता – १८०५.५०
- चेन्नई – १८६७.५०