मुक्तपीठ टीम
जगभरात कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे. परंतु, अजूनही याचे लसीकरण सुरू आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांनी असे औषध शोधून काढले आहे, जे माणसाला संसर्ग होण्यापासून तर वाचवेलच तसेच, विषाणूचा नाशही करेल. अमेरिका स्थित स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या मते, NMT5 नावाचे हे औषध सार्स-कोव्ह-२ म्हणजेच कोरोना विषाणूच्या नवनव्या उदयास येणाऱ्या व्हेरिएंट्सवर प्रभावी ठरेल.
या औषधामध्ये समाविष्ट असलेली रसायने कोरोना विषाणूला शरीरातील ACE2 रिसेप्टरशी संलग्न होण्यापासून रोखतात ज्यामुळे पेशींना आणखी संसर्ग होऊ शकत नाही.
NMT 5चे गुणधर्म कोणते?
- NMT 5 कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावरील छिद्र ओळखते आणि स्वतःला जोडते.
- शरीर रासायनिक रीतीने ACE2 रेणूमध्ये बदल करते, जेथे नायट्रोग्लिसरीन व्हायरस विरूद्ध शस्त्र म्हणून कार्य करते.
- अशाप्रकारे, जेव्हा विषाणू ACE2 ला चिकटतो तेव्हा तो स्वतःचा नाश करतो.
शास्त्रज्ञांनी NMT5 ची चाचणी माणसांवर तसेच प्राण्यांवर केली आहे. यावेळी असे आढळून आले की, कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करताच, हे औषध त्याच्या भागांवर चिकटते. NMT5 ची रासायनिक संघटना अशी आहे की ती व्हायरसचा वाहक म्हणून वापर करते. संशोधकांनी आशा व्यक्त केली आहे की हे औषध विषाणूच्या इतर व्हेरिएंट्सवरही प्रभावी ठरेल. NMT5 कोरोनाच्या नव्याने उदयास येत असलेल्या प्रकारांवरही प्रभावी ठरेल अशी अपेक्षा आहे.