Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

NMMSS स्कॉलरशिप: नवीन शिष्यवृत्ती किंवा नूतनीकरणाचाअर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
National Means Cum Merit Scholarship Scheme

मुक्तपीठ टीम

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती (NMMSS) शिष्यवृत्तीसाठी २०२२-२३ या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती, नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना NMMSS ही आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची आठव्या इयत्तेनंतर होणारी गळती रोखण्याच्या आणि शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दिली जाते. प्रत्येक वर्षी इयत्ता नववीमधील निवडक मुलांना एक लाख नवीन शिष्यवृत्ती बहाल केल्या जातात तसेच राज्य सरकारी, सरकारी अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती सुरू रहाते. या शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक १२ हजार एवढी असते.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजेच NSP हा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठीचा एकात्मिक डिजिटल मंच आहे. त्यावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीची शिष्यवृत्ती योजना ( NMMSS )आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीच्या शिष्यवृत्ती त्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केल्या जातात. ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.

ज्या मुलांच्या पालकांचे सर्व स्रोताकडून मिळणारे उत्पन्न वार्षिक साडेतीन लाखापेक्षा जास्त नसेल ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र आहेत. या शिष्यवृत्तीसाठी असलेल्या निवड परीक्षेला पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना सातवीच्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण किंवा तत्सम श्रेणी असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांमध्ये पाच टक्क्यांची सवलत आहे.)

यासाठी दोन टप्प्यात पडताळणी केली जाते. पहिल्या टप्प्यात संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याकडून (INO) तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्याकडून (DNO) अर्जाची पडताळणी होते. पहिल्या टप्प्यातल्या पडताळणीसाठी (INO-L1)शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२२ तर दुसऱ्या टप्प्याच्या पडताळणीसाठीची(DNO-L2) तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.

पाहा:


Tags: careergood newsMMCMSS ScholarshipMMCMSS स्कॉलरशिपmuktpeethNational Means and Merit ScholarshipNational Means Cum Merit Scholarship Schemeकरिअरचांगली बातमीनॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजनामुक्तपीठराष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती
Previous Post

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा १ नोव्हेंबरपासून प्रारंभ

Next Post

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात ‘सायंटिस्ट’ पदावर १२७ जागांसाठी भरती

Next Post
National Informatics Center

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 'सायंटिस्ट' पदावर १२७ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!