मुक्तपीठ टीम
देशभरात जातीनुसार जनगणना आयोजित करण्याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.आता पंतप्रधानांना भेटण्याची वाट ते पाहत आहेत.
देशभरात जातीनुसार जनगणना करण्याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. आता पंतप्रधानांना भेटून सविस्तर चर्चा करण्यासाठी ते प्रतिसादाची वाट पाहत आहेत. जातीनुसार जनगणनेबाबत पंतप्रधानांना पत्र पाठवल्याची माहिती त्यांनीच माध्यमांना दिली.
मुख्यमंत्री नितीशकुमारांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या पक्षाचे खासदार गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलले आहेत. पेगॅससशी संबंधित प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे, ते यावर आपला निकालही देईल. या प्रकरणात जे काही समोर येईल त्यावर कार्यवाही होईल.
जातीनुसार जनगणनेची मागणी कशासाठी?
• सध्या ओबीसी किंवा अन्य जातींची जी लोकसंख्या सांगितली जाते ती इंग्रजांच्या सत्ताकाळातील १९३१ च्या जनगणनेनुसार सांगितली जाते.
• भारतात जातीनुसार झालेली ती शेवटची जनगणना आहे.
• स्वतंत्र भारतात जातीनुसार जनगणना झालेली नाही.
• आत्तासुद्धा कोणत्याही जातीची लोकसंख्या टक्केवारीनुसार तेवढीच आहे, असे गृहित धरून त्याप्रमाणात आरक्षण देणे योग्य नाही, असं मांडलं जातं.
• जातीनुसार लोकसंख्या नक्की किती व त्या जातींची नेमकी वर्तमान स्थिती सामाजिक आणि राजकीय मागासलेपणांच्या निकषांवर कशी आहे, हेही माहिती नाही.
• त्यासाठी जातीनुसार जनगणना गरजेची आहे, असे अनेक नेते, तज्ज्ञांचे पाठवा.
• विविध मागास जाती-जमातींचा विकास व्हावा म्हणून अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजनांचा कितपत परिणाम होत आहे हे पाहण्यासाठीदेखील जातीनुसार जनगणना आवश्यक आहे.