मुक्तपीठ टीम
बिहारमध्ये बहुमत चाचणीच्या दिवशीच सीबीआयकडून धाडसत्र सुरु झाले. सीबीआयने बिहारमधील एकूण २४ ठिकाणी छापे टाकले आहेत. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे.राजदने या सीबीआयच्या धाडी नसून भाजपा संघटनेच्या धाडी असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे सूडाचे राजकारण असल्याचा भाजपावर आरोप केला आहे. एकीकडे या धाडी सुरु असतानाच दुसरीकडे बिहारमध्ये जदयू-राजदच्या नितिशकुमार-तेजस्वी यादव सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे.
पाहा काय घडलं बिहार विधानसभेत…
नितिशकुमार-तेजस्वी सरकारने सिद्ध केले बहुमत!
- बिहार विधानसभेत आज बहुमत चाचणी होती.
- बहुमत चाचणीच्या आधी भाजपा नेते यांनी विधानसभेचे अध्यक्ष विजय सिन्हा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- त्यामुळे त्यांच्याजागी उपाध्यक्ष महेश्वर हजारी यांनी काम पाहिले.
- बहुमत चाचणीच्यावेळी भाजपाने नितिशकुमारांना लक्ष्य करत आक्रमक आरोप केले.
- पण अखेर बाहेर धाजी पडत असतानाच नितिशकुमार-तेजस्वी सरकारने सिद्ध बहुमत सिद्ध केले.
या नेत्यांच्या ठिकाणी छापा!!
- आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत.
- यासोबतच आणखी एक राज्यसभा खासदार डॉ.फयाज अहमद यांच्या मधुबनी येथील घरावर छापा टाकला आहे.
- राजदचे एकूण चार नेते रडारवर आहेत.
- यामध्ये राबडी देवी यांचे खासगी सचिव नागमणी यादव आणि माजी आमदार आरजेडी अबू दोजाना यांचा समावेश आहे.
- यासोबतच सुनील सिंह यांच्या ठिकाणीही छापेमारी सुरू आहे.
आम्ही घाबरत नाही – राबडी देवी
- या छाप्यांवरून बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
- भाजपा नव्या सरकारला घाबरत आहे.
- छापे टाकून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आम्ही घाबरणार नाही.
- बिहारची जनता आमच्यासोबत आहे.
- त्याचवेळी या छाप्याबाबत आरजेडी नेते मनोज झा म्हणाले की, याला एजन्सींचे छापे म्हणू नका, भाजपा संघटनांचे छापे म्हणा.
- ते भाजपाच्या अंतर्गत काम करतात.
- भाजपाच्या स्क्रिप्टवरच या कार्यालयांचं कामकाज सुरु आहे.
- आज बहुमत चाचणी आहे आणि आता काय सुरु आहे? आता याचा पूर्ण अंदाज आला आहे.
काय आहे भरती घोटाळा?
- लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन आणि भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- या प्रकरणाच्या तपासानंतर सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मिसा यादव, हेमा यादव आणि काही संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता.
- या प्रकरणात ज्यांना भूखंड किंवा मालमत्तेच्या बदल्यात नोकरी देण्यात आली होती.
- यापूर्वी मे महिन्यात सीबीआयकडून याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित १७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
- सीबीआयची ही कारवाई तब्बल १४ तास चालली होती.
- त्यावेळी लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मिसा भारती यांच्या पाटणा, गोपालगंज आणि दिल्लीतील घरांवरही छापा टाकण्यात आला होता.