मुक्तपीठ टीम
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांनी चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात रविवारी १ हजार ४९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यात मुंबईत ९६१ तर नागपुरात ५ कोरोना रुग्ण सापडले आणि संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातही कोरोना वाढू लागला आहे. यावरून, राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील रुग्णवाढीला दिल्लीहून आलेल्या प्रवाशांना जबाबदार धरले आहे.
दिल्लीतून आलेल्यामुळे कोरोना वाढला!
- नागपूर शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे.
- दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे संसर्ग वाढतोय.
- नुकतेच ३५ रुग्ण आढळले त्यात सर्वाधिक दिल्लीतून येणारे होते.
- त्यामुळे विमानतळावरच त्यांचे चेकिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत.
- तसंच शहरात आणि ग्रामीण भागात चाचण्या वाढवण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.
राज्यातील कोरोना परिस्थिती…
- रविवारी राज्यात १४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले.
- रविवारी राज्यात १ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०४% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे.
- राज्यात रविवारी एकूण ६७६७ सक्रिय रुग्ण आहेत.
- रविवारी मुंबईत ९६१, पुणे ९४, ठाणे २८६, नाशिक ७, कोल्हापूर १, औरंगाबाद ३, नागपूर ५ रुग्णांची नोंद झाली.