Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील कवितांचे अभिवाचन

मराठी राजभाषा दिनानिमित्त ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अभिनव शुभेच्छा

February 28, 2021
in सरकारी बातम्या
0
nitin raut

मुक्तपीठ टीम

राज्याचे ऊर्जामंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी मराठी भाषा दिनानिमित्त समस्त मराठी जनतेला अभिनव पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दोन कवितांचे अभिवाचन केलेला एक व्हिडिओ डॉ. राऊत यांनी या निमित्त प्रसारित केला आहे.

मराठी भाषा समृद्ध करण्यात डॉ. आंबडेकरांच्या प्रेरणेने सुरू झालेली दलित चळवळ आणि दलित साहित्य यांनी मोठे योगदान दिले आहे. हे योगदान अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न म्हणून महाकवी नामदेव ढसाळ आणि वामनदादा कर्डक यांच्या कवितांचे अभिवाचन डॉ. राऊत यांनी केले आहे.

“माझ्या जीवनावर आणि राजकीय व सामाजिक संघर्षावर सर्वाधिक प्रभाव आहे तो म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा. प्रत्येक आंबेडकरी व्यक्तीचा प्राण हे डॉ. आंबेडकर आहेत. त्यांच्याबद्दलची आमची कृतज्ञतेची भावना महाकवी नामदेव ढसाळ आणि वामनदादा कर्डक यांनी त्यांच्या कवितांमधून व्यक्त केली आहे. त्या कवितांचे वाचन करणार आहे,” असे म्हणत त्यांनी दोन कवितांचे अभिवाचन केले आहे.

 

नामदेव ढसाळ यांची ही कविता त्यांनी वाचून दाखवली आहे.

“आज आमचे जे काही आहे..

ते सर्व तुझेच आहे

हे जगणे आणि हे मरणे

हे शब्द आणि ही जीभ

हे सुख आणि दुःख

हे स्वप्न आणि हे वास्तव

ही भूक आणि तहान

ही सर्व पुण्याई तुझीच आहे”

 

वामनदादा कर्डक यांच्या पुढील कवितेचेही अभिवाचन त्यांनी केले आहे.

“भाजीत भीम आहे

रोटीत भीम आहे

आहे उपास पोटी

कोटीत भीम आहे

 

भीमा नदीचे पाणी

नेले अशा ठिकाणी

त्या गावच्या नळाच्या

तोटीत भीम आहे!”

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारवंत, समाजसुधारक, संपादक आणि घटनातज्ञ या भूमिकेतून केलेल्या विविधांगी लेखनाने आणि दलित साहित्याने मराठी भाषेला नवी समृद्धी मिळवून दिली. त्यामुळेच डॉ.आंबेडकरांवरील कवितांचे अभिवाचन करून मी #मराठीराजभाषादिन निमित्त शुभेच्छा दिल्या.@INCMaharashtra pic.twitter.com/IvGJv2Gfwm

— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) February 27, 2021


Tags: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतडॉ. बाबासाहेब आंबेडकरमराठी भाषा दिन
Previous Post

“आता प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव!”

Next Post

रविवार ठरला ‘इस्त्रो’वार…पीएसएलव्ही रॉकेटने १९ उपग्रह अंतराळात!

Next Post
PSLV 28-2-21 -1

रविवार ठरला 'इस्त्रो'वार...पीएसएलव्ही रॉकेटने १९ उपग्रह अंतराळात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!