Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ऊर्जा शैक्षणिक पार्क’ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

June 8, 2021
in सरकारी बातम्या
0
nitin raut

मुक्तपीठ टीम

कोराडी (नागपूर) येथे उभारण्यात येणारा ‘उर्जा शैक्षणिक पार्क’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि देशातील सर्वोत्कृष्ट तसेच एकमेवाद्व‍ितीय व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश करावा, अशा सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. कोराडी येथे प्रस्तावित ‘ऊर्जा शैक्षणिक पार्क’ बाबत आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

 

या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, ‘महानिर्मिती’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, ऊर्जा विभागाचे सहसचिव उद्धव वाळुंज हे मंत्रालयातून तर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी आणि प्रकल्पासाठी नियुक्त वास्तुशास्त्रज्ञ अशोक मोखा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थ‍ित होते. यावेळी मोखा यांनी ऑनलाईनरित्या प्रकल्पाचे संगणकीय सादरीकरण केले.

 

अर्थसंकल्पीय भाषणात समावेश केलेला हा ऊर्जा पार्कचा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असे सांगून डॉ. नितीन राऊत यावेळी म्हणाले, हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा यासाठी देशातील विविध ऊर्जा पार्क प्रकल्प, विज्ञान पार्क आदी प्रकल्पांना भेट देऊन तेथील रचना आणि संरचना समजून घ्यावी. त्यानुसार कोराडी येथील प्रकल्प हा देशातील अन्य प्रकल्पांपेक्षा वेगळेपण दर्शवणारा असावा अशा स्वरुपाचे त्याचे डिझाईन करावे. या प्रकल्पाला लहानमोठे सर्वच भेट देणार असले तरी बालकांची जिज्ञासा केंद्रस्थानी ठेऊन प्रदर्शन आणि मनोरंजनात्मकता लक्षात घेऊन तशी रचना करावी. भविष्यात कमी होत जाणारे ऊर्जा स्रोत पाहता ऊर्जा बचतीचे महत्त्व सांगणारा इंटरप्रिटेशन कक्षावर अधिक भर दिला जावा. जेणेकरुन भावी पिढी ऊर्जा बचतीद्वारे एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात भर घालतील.

 

या ऊर्जा पार्कमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प अशा पारंपरिक प्रकल्पांसोबतच भू- औष्णिक, समुद्राच्या लाटांवर आधारित (टायडल एनर्जी) प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जा अंतर्गत बायो-मास, बायोगॅस वरील ऊर्जा प्रकल्प, हरित ऊर्जा अंतर्गत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा तसेच सौर आणि पवन ऊर्जा निर्म‍ितीचे हायब्रीड प्रकल्प, छतावरील सौरऊर्जा प्रकल्प आदींच्या मॉडेल्सचा समावेश करावा. त्याशिवाय याद्वारे निर्म‍ित होणारी वीज विद्युत निर्मिती प्रकल्प ते ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास दर्शवण्यात यावा. स्मार्ट मीटर, स्मार्ट होम ज्यामध्ये घरातील स्मार्ट इलेक्ट्रिक उपकरणे आदींची दालनेही ठेवण्यात यावी.

 

येथे येणारे पर्यटक, बालके यांनी प्रदर्शनाच्या पाहणीनंतर खरेदीसाठी ठेवलेल्या वस्तू, कपड्यांवर ऊर्जा बचतीचे महत्त्व दर्शवणारे संदेश प्रदर्श‍ित करावेत, असे सांगत डॉ. राऊत यांनी प्रकल्पाच्या डिझाईनबाबतही विविध सूचना केल्या.

 

प्रधान सचिव वाघमारे यांनी पारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसोबतच अपारंपरिक ऊर्जास्रोत आणि अपारंपरिकमधीलच नवीन स्रोत उदा. बॅटरीद्वारे विद्युत उर्जा साठवणूक, वीजेवर चालणारी वाहने आदींचाही या ऊर्जा पार्कमध्ये समावेश करावा अशा सूचना दिल्या. हे पार्क ऊर्जा शिक्षण पार्क व्हावे, असेही ते म्हणाले. अपारंपरिक ऊर्जेला केंद्र शासन तसेच राज्य शासनाने अधिक महत्त्व देण्याचे ठरवले असल्याने यामध्ये सौरऊर्जा आदी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना अधिक महत्त्व द्यावे. त्यासाठी ‘महाऊर्जा’ आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोत क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही ते म्हणाले.

खंदारे म्हणाले, मुलांना हसत- खेळत आणि स्वत: सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करुन देत उर्जेचे विविध स्त्रोत आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात यावा, अशी या पार्कमधील दालनांची रचना करावी. खूप तांत्रिक आणि क्ल‍िष्ट बाबींमध्ये न जाता मूलभूत बाबींचे ज्ञान यातून दिले जावे जेणेकरुन मुले ते आयुष्यभर विसरणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले.

 

शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून हसत-खेळत शिक्षण मिळावे, त्यांना उर्जेचे स्त्रोत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी हाताळता यावे, सोबतच मनोरंजन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या ऊर्जा पार्क उभारण्यामागचा उद्देश आहे.

 


Tags: Energy Educational ParkEnergy Minister Dr. Nitin Rautnagpurउर्जामंत्री डॉ. नितीन राऊतऊर्जा पार्ककोराडीनागपूरप्रधान सचिव वाघमारे
Previous Post

पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मंत्री भेटले, तेव्हा कोणते मुद्दे मांडले?

Next Post

कोरोना संकटातील मुंबई मनपाच्या कामगिरीचे ‘प्रजा’ कडूनही कौतुक, मात्र कचरा समस्येबद्दल वेगळं मत

Next Post
Praja

कोरोना संकटातील मुंबई मनपाच्या कामगिरीचे 'प्रजा' कडूनही कौतुक, मात्र कचरा समस्येबद्दल वेगळं मत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!