Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नागपूरातील बंद एमएपीएल कंपनीला कोरोना सेंटरमध्ये पुनर्जीवित करा”

नितीन राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

May 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
dr. nitin raut

मुक्तपीठ टीम

 

नागपूर महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील बंद असलेल्या महाराष्ट्र अँटिबायोटिक अँड फार्मासुटीकल लिमिटेड (एमएपीएल) या औषध निर्मिती कंपनीला पुनर्जीवित करून त्याचे रूपांतर ऑक्सिजन व औषध निर्मिती युनिटसह जंबो कोरोना सेंटरमध्ये करण्याची विनंती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ही कंपनी महाराष्ट्र सरकारने अधिग्रहित करावी अशी महत्वपूर्ण सूचनाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात डॉ राऊत यांनी एमएपीएलला पुनर्जीवित करण्याची योजना मांडली आहे.

 

राज्य सरकार व केंद्र सरकारच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक लिमिटेड (एचएएल) यांच्या संयुक्त उपक्रमातुन एमएपीएल नागपूर एमआयडीसीत सन १९८० साली सुरू करण्यात आली होती. तेथे जीवनावश्यक औषधे व जेनेरिक मेडीसिनची निर्मिती कऱण्यात येत असे. परंतु सन १९९५-९६साली ही कंपनी तोट्यात आल्याने बंद करण्यात आली होती.

 

सध्या कोरोना महामारीने देशात सर्वत्र थैमान घातले असून बंद असलेल्या या औषध निर्मिती कंपनीच्या इमारतीत व जागेत अल्पावधीतच ऑक्सिजन व कोरोना आजारावरील प्राण वाचविणारे औषधे जसे रेमडसिविर व कोव्हँक्सिन या लसीची निर्मिती करणे शक्य आहे. सोबतच या कंपनीच्या इमारतींत कोरोना हॉस्पिटल अल्पावधीतच चालू करणे शक्य असल्याचे डॉ राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

 

“महाराष्ट्र सरकारने एमएपीएलचे अधिग्रहण करून या कंपनीच्या परिसरात जंबो कोरोना सेंटर आणि डे केअर सेंटर, मोठ्या क्षमतेचे वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती केंद्र, रेमेडेसीविर आणि इतर जीवनरक्षक औषधांची निर्मिती करावी तसेच आत्मनिर्भर भारत मिशन ३.० अंतर्गत कोव्हक्सींन लसीची निर्मिती करण्यात यावी,” अशी मागणी डॉ. राऊत यांनी आपल्या पत्रात केली आहे. तोट्यात असलेल्या एमएपीएलचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक लि (एचएएल) याच्याकडे असून सन १९९५-९६ साली चालू भांडवली अभावी बंद करण्यात आली होती. यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (सिकाम) मर्यादित याची ३३ टक्के भागीदारी आहे तर ५९ टक्के हिस्सेदारी एचएएलची आहे तर ८ टक्के हिस्सेदारी आयडीबीआयची आहे.

 

केंद्र सरकारने एमएपीएलला पुनर्जीवित करण्यासाठी १०० कोटी रुपये एचएएलच्या माध्यमातून देण्याची तयारी २०१५ मध्ये दर्शवली होती. मात्र प्रत्यक्षात हा निधी देण्यात आला नाही. जागतिक निकषांनुसार औषधे, गोळ्या आणि इंजेक्शन आणि अन्य उत्पादने करण्याची क्षमता या कारखान्यात आहे. एकूण ५० हजार ५८५ चौरस मीटरवर या कारखान्याचे क्षेत्रफळ विस्तारले आहे. असल्याने जर चालू भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली तर अल्पावधीतच येथे रुग्णालयासोबत औषध व ऑक्सिजन निर्मिती सुरू करता येणे शक्य असल्याने यावर त्वरित निर्णय घेण्याची डॉ राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्राद्वारे केली आहे. एमएपीएलला पुनर्जीवित झाल्याने विदर्भात रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे डॉ राऊत यांनी म्हटले आहे.


Tags: chief minister uddhav thackerayEnergy Minister Dr. Nitin Rautnagpurएमएपीएल नागपूरकेंद्र सरकारडॉ. नितीन राऊतनागपूरराज्य सरकार
Previous Post

भाजपा नेत्यांना आवडणार नाही अशी सर्वोच्च न्यायालयातील ‘ही’ बातमी!

Next Post

आज नवे आणि बरे झालेल्यांमध्ये फक्त ६००चे अंतर!

Next Post
MCR 1-5-21

आज नवे आणि बरे झालेल्यांमध्ये फक्त ६००चे अंतर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!