मुक्तपीठ टीम
अनेकदा नेत्यांची कमाई हा फार वेगळ्या पद्धतीनं चर्चेचा विषय होत असतो. त्यातही भारतात तर हजारो कोटींच्या नेमके शून्य किती ते माहित नसणाऱ्या आकड्यांची संपत्ती असलेल्या नेत्यांच्या सुरस चमत्कारिक कथा रंगवून सांगितल्या जातात. अशावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलेला त्यांचा उत्पन्नाचा एक नवा मार्ग हा फारच वेगळा आहे. इंदूरमधील रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करताना गडकरींनी याविषयीची माहिती उघड केली. कोरोनाच्या संकट काळात वेळ सार्थकी लावण्यासाठी दिलेल्या ऑनलाइन व्याख्यानांचे यूट्युबवरील व्हिडीओ आता दमहा ४ लाख रुपये मिळवून देत आहे, असे गडकरी म्हणाले.
गडकरींचा नव्या कमाईचा यूट्युब-वे!
- गडकरींनी कोरोना लॉकडाउनमध्ये काय घडले ते दिलखुलासपणे मांडले.
- ते म्हणाले, कोरोनाने मला दोन गोष्टी दिल्या.
- एक म्हणजे युट्युबवर पाहून बरंच काही घरीच बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.
- दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग.
- व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा, संवादाला सुरुवात केली.
- त्यांना अमेरिका, न्यूझीलंड, जर्मनी, विद्यापीठांमध्ये भाषण देण्याची संधी मिळाली
- त्या व्याख्यानांचे व्हिडीओ यूट्युबवर अपलोड करण्यात आले.
- त्या व्हिडीओंमुळे युट्युब वरून महिन्याला ४ लाख रुपये मिळण्यास सुरुवात झाली.
सर्वात लोकप्रिय टॉप-१० यूट्युब चॅनल्स
१. टी-सीरीज- १६.९ कोटी सब्सक्राइबर्स
२. PewDiePie- १०.८ कोटी सब्सक्राइबर्स
३. कोकमेलॉन-नर्सरी राइम्स- १०.३ कोटी सब्सक्राइबर्स
४. सेट इंडिया- ९.४४ कोटी सब्सक्राइबर्स
५. डब्ल्यूडब्ल्यूई- ७.२४ कोटी सब्सक्राइबर्स
६. ५-मिनट क्राफ्ट- ७.०६ कोटी सब्सक्राइबर्स
७. जी म्यूजिक कंपनी- ६.८ कोटी सब्सक्राइबर्स
८. कनॅल कोंडजिला- ६.३ कोटी सब्सक्राइबर्स
९. जस्टिन बीबर- ६.०६ कोटी सब्सक्राइबर्स
१०. डूड परफेक्ट- ५.४९ कोटी सब्सक्राइबर्स
यूट्युबचं काम कसं चालतं?
- यूट्युबचे कर्मचारी पारदर्शकता, कंटेन्ट स्ट्राइक आणि जाहिरात उत्पन्नावर लक्ष ठेवतात.
- अल्गोरिदम एका विशिष्ट कालावधीत बदलला जातो.
- एखाद्या चॅनलवर कॉपिराइट कंटेन्ट वापरला जातो तेव्हा यूट्युब त्याला स्ट्राइक पाठवते.
- कोणत्याही एका चॅनलवर ९० दिवसात ३ स्ट्राइक येतात, तेव्हा त्या चॅनलला बंद केले जाते.