मुक्तपीठ टीम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका केली जात आहे. एवढचं नाही तर त्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा केली जात आहे. राज्यात भाजपासोबत युतीत असणाऱ्या शिंदे गटाने सुद्धा राज्यापालांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटात मतभेद निर्माण झाले आहे. या सर्व गदारोळानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अखेर मौन सोडले आहे. गडकरी भाजपा आणि शिंदे गटाची युती वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, महाराजांचे नाव आपल्या आई-वडिलांपेक्षाही अधिक आदराने घेतो”, असे गडकरी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत!!
- नितीन गडकरी यांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
- या ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी त्यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
- या व्हिडीओमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
- “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे.
कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे. - यशवंत किर्तीवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा, निश्चयाचा महामेरू! बहुत जनांसी आधारू! अखंड स्थितीचा निर्धारू! श्रीमंत योगी. वेळ पडली तर आपल्या मुलाला देखील कठोर शिक्षा देणारा आमचा राजा होता,” असे नितीन गडकरी म्हणताना दिसत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत. pic.twitter.com/QOe2l7A7tM
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) November 21, 2022
यावरून झाला वाद!!
- आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला तुमचा फेव्हरेट हिरो कोण असे विचारायचे तेव्हा कुणाला सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरु चांगले वाटायचे.
- पण मला असं वाटतंय की जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचा आदर्श कोण तर बाहेर जाण्याची गरज नाही.
- महाराष्ट्रातच तुम्हाला मिळून जातील.
- छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत.
- नव्या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉक्टर नितीन गडकरी पर्यंत इथेच आदर्श मिळतील.
- त्यांच्या या विधानावर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कडाडून विरोध केला.
- भाजपासह राज्यात युतीत असणाऱ्या एकनाथ शिंदे गटानेही आक्षेप घेतला आहे, शिंदे गटाने तर भगतसिंग कोश्यारी यांची राज्यातून तत्काळ बदली करावी, असे म्हटले होते.