मुक्तपीठ टीम
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता त्यांच्या बुलेट प्रूफ कारला राम-राम ठोकले आहे. नागपूर शहर सुंदर, स्वच्छ आणि हरित करण्यासाठी गडकरी यांनी यापुढे पेट्रोल किंवा डिझेल कारचा वापर करणार नसून त्यांनी आता इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात केली आहे.
नितीन गडकरी जेव्हा नागपुरात येतात तेव्हा ते पारंपारिक इंधनच्या कारऐवजी इलेक्ट्रिक कारचा वापर करतात. शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच इलेक्ट्रिक कारकडे आता एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते. अशा परिस्थितीत स्वत: गडकरी यांनी या कारना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, “देशामध्ये भविष्यात केवळ बायो-डिझेल, इथेनॉल, इलेक्ट्रिक, बायोफ्युल आणि हायड्रो-इंधन यासारख्या वस्तू इंधन म्हणून कामात येणार आहेत”, असे नितीन गडकरी म्हणाले.
नवी कार खरेदीवर ५ टक्के सुट
- जुन्या वाहनांना भंगारात टाकावे असे केंद्र सरकारने जनतेला आवाहन केले आहे.
- या नियमानुसार जुन्या कारला भंगार देऊन नवीन कार खरेदी करताना ५ टक्के सवलतही दिली जाईल.
- अशा परिस्थितीत जुन्या वाहन धारकांना मोठा फायदा होणार आहे.
- मोदी सरकारने आणलेल्या अर्थसंकल्पात स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर करण्यात आली.
- त्यानुसार २० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची तंदुरुस्ती चाचणी घ्यावी लागेल तर व्यावसायिक वाहनांसाठी हा कालावधी १५ वर्षे असेल.