मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मंगळवारी रात्री उशिरा जामीन मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्रात अनेक पडसाद उमटले. जामिनानंतर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी सूचक ट्वीट करत शिवसेना आणि विरोधकांना इशारा दिला आहे. ‘राजनीती’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा व्हिडीओ नितेश राणेंनी शेअर केला आहे.
नितेश राणेंचं ट्वीट
- नारायण राणेंना जामीन मिळाल्यानंतर नितेश राणेंनी मिळाल्यानंतर नितेश राणेंनी अभिनेता मनोज वाजपेयी याच्या एका व्हिडिओ शेअर केला.
- आमदार नितेश राणेंनी मनोज वाजपेयीच्या एका चित्रपटातील व्हिडीओ शेअर करत एक ट्वीट केलं आहे.
- त्या ट्वीटमधील व्हिडीओत मनोज वाजपेयींचा पुढील डायलॉग आहे: “मगर आसमान में थुंकने वालों को शायद ये पता नही है, की
- पलटकर थुंक उन्ही के चेहरे पर गिरेगी…. करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा.” मध्यरात्री नितेश राणेंनी हे ट्वीट केले.
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021
नारायण राणेंचा अटक ते जामीनपर्यंतचा घटनाक्रम
- नारायण राणेंना अटक केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांना रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं.
- तिथून त्यांना महाड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं.
- त्यानंतर राणेंना रात्री ८.३५ वाजताच्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.
- राणे स्वत:च्या गाडीने आले होते.
- त्यांच्यासोबत पुत्र नितेश राणे, भाजप नेते प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते.
- राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.
- यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.