मुक्तपीठ टीम
वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेची ४४वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अॅम्ब्युलन्स भाड्यात जीएसटी कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी घेतला आहे. यासह परिषदेने बैठकीत कोरोना साथीच्या आजाराशी संबंधित आवश्यक वस्तू आणि काळ्या बुरशीच्या उपचारात वापरल्या जाणार्या औषधांवरील जीएसटी दर कमी केले आहेत. काळ्या बुरशीच्या औषधावर कोणताही कर नसणार असा निर्णय घेण्यात आला आहे.
म्युकर मायकॉसिसची औषधे करमुक्त
• म्युकर मायकॉसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या औषधावर कोणताही कर नसणार आहे.
• कोरोना लसींवर ५ टक्के जीएसटी
• केंद्र सरकार ७५ टक्के लस खरेदी करीत असून त्यावर जीएसटीही भरत आहे.
• सरकारी दवाखान्यात लोकांना ७५ टक्के लस दिली जात असून त्याचा जनतेवर परिणाम होणार नाही.
• अर्थमंत्री निर्मला सीतारामण तसे म्हणाल्या असल्या तरी २५ टक्के पुरवठा हा खासगी रुग्णालयांसाठी असल्याने तेथे लस घेणाऱ्यांना नक्कीच लाभ मिळू शकेल.
कोरोनासाठी आवश्यक औषधांवरील कर ५ टक्क्यांवर
• रेमडेसिव्हिर नावाच्या औषधाचे कर दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
• त्याचप्रमाणे, टॉसिलीझुमॅब आणि अँफोटेरेसिन बी सारख्या औषधांवर कोणतेही कर आकारले जाणार नाही.
आवश्यक वैद्यकीय वस्तूंवरही ५ टक्के कर
• ऑक्सिजन, ऑक्सिजन उत्पादन उपकरणे, टेस्टिंग किट, इतर मशीन्स आणि कोरोना सामग्रीचा समावेश आहे.
• व्हेंटिलेटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि बीआयपीएपी मशीनवरील जीएसटी सध्याच्या १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आले आहे.
रुग्णवाहिकांसाठी १२ टक्के जीएसटी
• कोरोना संकट काळात रुग्णवाहिकांची लोकांचे प्राण वाचविण्यात मोठी भूमिका आहे. त्यामुळे त्यावर जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
• कोरोना काळात बर्याच गोष्टींवर १८ टक्के जीएसटी लादला जात होता, तो आता ५ टक्क्यांवर आला आहे.
• अशा बर्याच गोष्टी आहेत, ज्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला होता, तो देखील ५ टक्के करण्यात आला आहे.