मुक्तपीठ टीम
कोळसा टंचाईमुळे महाराष्ट्रासह देशतील अनेक राज्यांवर विजेचे संकट ओढावले आहे. गेल्या सहा वर्षात देशात पहिल्यांदाच वीज संकटाचा हा प्रकार घडला आहे. एप्रिल-२०२२ च्या पहिल्या २७ दिवसांत मागणीच्या तुलनेत १.८८ अब्ज युनिट्सचे विजेचे संकट आले आहे. उष्णतेमुळे वीजेची वाढती मागणी आणि त्याचवेळी कोळशाचा मोठा तुटवडा यामुळे वीज टंचाईची संकटासारखी समस्या निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत हे संकट अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वीज संकटामुळे ही राज्य त्रस्त
- महाराष्ट्र
- उत्तर प्रदेश
- बिहार
- झारखंड
- उत्तराखंड
- राजस्थान
- आंध्र प्रदेश
- गुजरात
- पंजाब
देशातील विजेच्या मागणीत प्रचंड वाढ…आणखी वाढण्याची शक्यता!
- केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी देशात २,७,११ मेगावॅट विजेची मागणी होती, ज्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
- २६ एप्रिल रोजी मागणीने वीजपुरवठ्यापेक्षा एवढी वाढ केली होती की देशात ८.२२ गीगाव्हॅटचे विजेचे संकट निर्माण झाले होते.
- यावर्षी मार्चमध्ये विजेच्या मागणीत ८.९ टक्के वाढ झाली आहे.
- एवढेच नाही तर मंत्रालयाचे म्हणणे आहे की जर विजेची मागणी अशीच राहिली तर मे-जूनमध्ये विजेची मागणी २१५ ते २२० गीगाव्हॅट असू शकते.