मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या आरोपांना अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता अमृता फडणवीस यांच्या टीकेवर नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्य तुमच्या बाजूने आहे तर घाबरता कशाला? असा सवालच निलोफर मलिक खान यांनी अमृता फडणवीस यांना केला आहे.
काय म्हणाल्या निलेफर?
- निलोफर मलिक खान यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे.
- तुमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नसेल तर तुम्हाला मलिक यांच्या पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये.
- सत्य जर तुमच्या बाजूने आहे तर भीती बाळगू नका.
- जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील.
- महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा आहे.
If there aren’t any hidden skeletons in 1’s closet, press conferences shouldn’t bother them. When u have the truth by ur side, fear seldom has any hold. If there are any malicious intentions, they will be exposed. Our only agenda should be the growth & progress of Maharashtra. https://t.co/8F0lDbn1XC
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 9, 2021
अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?
- अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा दोनदा बिगडे नवाब असा उल्लेख केला होता.
- आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते.
- आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही.
- त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे.
- तुम्हाला राजकारण करायचं आणि बिगडे नवाब व्हायचं आहे तर तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा.
- तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो.
- बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील.
- त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सूपर बॉसला.
निलोफर मलिक खान यांची फडणवीसांना नोटीस
- नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडलं, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
- त्यांच्या आरोपानंतर फडणवीस विरुद्ध मलिक अशी लढाई सुरु झाली आहे.
- मलिकांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाहीय.
- या सगळ्या प्रकरणानंतर नवाब मलिक यांची लेक निलोफर यांनी आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांना थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
- आज सकाळी १० वाजता घेतल्ल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी फडणवीसांनी विधाने मागे घ्यावेत अन्यथा मागी मागावी, अशी मागणी केली.
- तसंच माफी मागितली नाही तर नोटीस रेडी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.