मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे भाजपा नेते त्यांच्याविषयी देत असलेल्या प्रतिक्रियांच्या विपरित तिखट प्रतिक्रिया दोनच भाजपा नेत्यांनी दिल्या आहेत. सरनाईकांनी त्या पत्रात नाव न घेता माजी खासदार किरीट सोमय्यांवर दलालीचा आरोप केल्यामुळे ते आणि कडवट शिवसेनाविरोधासाठी प्रसिद्ध राणे कुटुंबातील एक निलेश राणे यांनी. भाजपा नेते निलेश राणे यांनी पत्राच्या निमित्तानं शिवसेनेलाच सुनावलं आहे.
गुडघे टेका, माफी नाही!
- प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसत आहे.
- सर्व मंत्र्यांना जेल जवळ दिसत आहे, म्हणून युती पाहिजे.
- यानंतर आता अनिल परब आहेत.
- जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? अशी माफी मिळणार नाही.
- यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागले, तरी त्यांना माफी मिळणार नाही.
अजित पवारच राज्य चालवतात!
- उपमुख्यमंत्री अजित पवार हेच राज्य चालवत आहेत.
- ही काही नवीन गोष्ट नाही. सुरुवातीपासून तेच सांगतो आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे?
- ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्याठिकाणी निधी दिला जातो.
- या सत्तेत नामधारी म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत.