Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून १८+ सर्वांचं मोफत लसीकरण, लसीकरणाचे नवे नियम जाणून घ्या!

मुंबईत सध्या ३० पेक्षा जास्त वयोगटासाठीच लसीकरण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७ जून रोजी जाहीर केल्याप्रमाणे आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण आहे. महाराष्ट्रात याआधीही सरकारी लसीकरण हे मोफतच होते, पण जेथे नव्हते त्या राज्यांमध्येही आता सरकारी केंद्रांवर लसीकरणासाठी पैसे मोजण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी नवी नियमावली जारी केली आहे. त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

 

लसीकरणातले नवे बदल काय आहेत?

  • आतापर्यंत महाराष्ट्रासारखे अपवाद वगळता काही राज्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटाल्या नागरिकांना लसीकरणासाठी पैसे मोजावे लागत होते.
  • आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण होणार आहे.
  • आतापर्यंत केंद्र सरकार लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ५० टक्के डोस विकत घेत होती.
  • आता हाच आकडा ७५ टक्क्यांवर पोहोचणार आहे.
  • राज्य सरकार लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून २५ टक्के डोस विकत घेत होती. आता केंद्र सरकारच या लसी विकत घेऊन राज्य सरकारांना मोफत देणार आहेत.
  • खासगी रुग्णालयं लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून आधीच्या नियमांप्रमाणेच २५ टक्के लसी विकत घेऊ शकतात.

 

खासगी रुग्णालयांमध्ये लसींच्या किंमती किती असणार?

लस – कोविशिल्ड

  • मूळ किंमत – ६०० रुपये
  • जीएसटी – ३० रुपये
  • सर्विस चार्ज- १५० रुपये
  • एकूण किंमत – ७८० रुपये

 

लस – कोवॅक्सिन

  • मूळ किंमत – १२०० रुपये
  • जीएसटी – ६० रुपये
  • सर्विस चार्ज- १५० रुपये
  • एकूण किंमत – १४० रुपये

 

लस – स्पुटनिक व्ही

  • मूळ किंमत – ९४८ रुपये
  • जीएसटी – ४७ रुपये
  • सर्विस चार्ज- १५० रुपये
  • एकूण किंमत – ११४५ रुपये

 

राज्यांना किती लसींचा पुरवठा होणार?

  • राज्याची लोकसंख्या, कोरोनाग्रस्तांचा आकडा आणि लसीकरणाचा वेग पाहून केंद्राकडून राज्याला लसींचा पुरवठा केला जाईल.
  • त्यासोबतच राज्याने लसी वाया घालवल्यास त्वरित लसींचा पुरवठा थांबवला जाईल.
  • केंद्रांना राज्यांना आधीच किती लसी मिळणार, याची कल्पना दिलेली आहे.
  • जेणेकरुन राज्यांना त्या पद्धतीने तयारी करण्याचा वेळ देण्यात आला आहे.

 

आता थेट लसीकरण केंद्रावरही नोंदणी

  • सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरणाची व्यवस्था
  • लसीकरणासाठी कोविन ऍपची नोंदणी आवश्यक आहे.
  • मात्र केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येईल.
  • आर्थिकदृष्ट्या कमकुत गटासाठीही ई-वाऊचरची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • या वाऊचरमुळे गरिबांना खासगी रुग्णालयातही मोफत लसीकरण करता येईल.
  • ज्या व्यक्तीच्या नावावर वाऊचर असेल, त्यालाच लस मिळेल.

Tags: PM Narendra modivaccinationकोविशिल्डकोवॅक्सिनपंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारी लसीकरणस्पुटनिक-व्ही
Previous Post

“जर जेल टाळायचा तर भाजपासमोर गुडघे टेका, पण माफी नाही!”

Next Post

कोरोना संकटात योगा हा आशेचा किरण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post
narendra modi yoga

कोरोना संकटात योगा हा आशेचा किरण! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!