Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उदयपूरसारखे अमरावती हत्याकांड झाल्याचा आरोप! एनआयए चौकशी करणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anil Bonde

मुक्तपीठ टीम

उदयपूर हत्याकांडसारखे प्रकरण अमरावती जिल्ह्यातही समोर आले आहे. गेल्या २१ जून रोजी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हेची एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी गळा चिरून हत्या केली. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या, त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप भाजपाचे आमदार डॉ अनिल बोंडे यांनी केला आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएचं पथक अमरावतीत दाखल झालं आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात ५ आरोपींना अटक केली आहे. घडलेल्या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

उदयपूरसारखे अमरावती हत्याकांड असल्याचा बोंडेंचा आरोप!

  • अमरावती येथील अमित मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी नुपुर शर्माच्या समर्थनार्थ काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या आणि म्हणून त्यांची हत्या झाली, असा अंदाज अनिल बोंडे यांनी केला आहे.
  • राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या हत्येप्रमाणेच अमरावती शहरात ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
  • या हत्येचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपाच्या वतीनं पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती.
  • अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत भाजपाचं एक शिस्तमंडळ पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना भेटलं आणि घटनेचा मुख्य आरोपीचा तपास करा, अशी मागणी केली होती.
  • या प्रकरणी अटकेत असलेल्या ५ आरोपींनी अद्याप हत्येचा उद्देश सांगितला नाही, आम्हाला एकानं हत्या करण्यास सांगितलं, अशी माहिती त्यांनी दिली.

हत्येचा सूत्रधार शोधण्यासाठी भाजपाची एसआयटी तपासाचीही मागणी!

  • या हत्येचा सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपनं केली होती. अशातच, एटीएस याप्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.
  • एटीएसच्या सूत्रांनी सांगितलं की, ते या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध आहे का? याचा तपास करत आहे.
  • उदयपूरच्या आरोपींप्रमाणे अमरावतीच्या आरोपींनीही हाच नमुना वापरला आहे का, याचा तपास एटीएस करत आहे.
  • तपास अजूनही स्थानिक पोलिसांकडे आहे, पण एटीएस समांतर तपास करत आहे.
  • एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, महाराष्ट्र एटीएसचं पथक गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत आहे.

Tags: amravatiAnil bondeBJPNIASITudaypurअनिल बोंडेअमरावतीउदयपूर हत्याकांडउमेश कोल्हेएनआयएएसआयटी
Previous Post

भाजपावासी झालेल्या एका शिंदेंकडून भाजपाजवळ आलेल्या दुसऱ्या शिंदेंचं समर्थन!

Next Post

भाजपाचं मिशन दक्षिण: हैदराबादेतील राष्ट्रीय कार्यकारिणीत रझाकारी अत्याचारांचीही आठवण!

Next Post
BJP Mission South India

भाजपाचं मिशन दक्षिण: हैदराबादेतील राष्ट्रीय कार्यकारिणीत रझाकारी अत्याचारांचीही आठवण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!