मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रिक वाहनांना वाहतुकीचे भविष्य मानले जाते. त्यामुळे अनेक कंपन्या एकाचवेळी या नव्या विस्तारीत क्षेत्रातील संधीत वेगवेगळ्या संकल्पनांसह सरसावत आहेत. भारतातील आघाडीचा ई-मोबिलिटी ब्रँड नेक्सझू मोबिलिटीने www.nexzu.in वरून आपल्या ई-सायकल आणि स्कूटरची संपूर्ण भारतातील डिलिव्हरी सुरू केली आहे. नेक्सझू मोबिलिटीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ई-सायकल खरेदीपासून वॉरंटी, नोंदणी आणि सेवेपर्यंत संपूर्ण ऑनलाइन सोयी ऑफर करत आहे. रोम्पस +, रोडलार्क आणि रोडलार्क कार्गोसारख्या विविध मॉडेल्समधून निवडून नेक्सझू मोबिलिटी ई-कॉमर्स वेबसाइटला भेट देऊन ग्राहक ई-सायकल बुक करू शकतात.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नेक्सझू मोबिलिटी ई-सायकलसाठी विमा खरेदी करण्याचा पर्याय देखील देते तसेच या वेबसाइटमध्ये तुम्हाला असेंब्ली प्रक्रियेत मदत करण्यासाठी DIY व्हिडिओ देखील समाविष्ट आहेत. अधिक सोयीस्कर स्कूटर खरेदी करण्यासाठी ई-सायकल कंपनी झेस्ट मनी सोबत इएमआय पर्याय देखील देत आहे. याशिवाय, नेक्सझू मोबिलिटी उत्पादने अॅमेझॉन, ई-व्हीलर्स आणि ब्लाइव्हवर देखील उपलब्ध आहेत.
नेक्सझू मोबिलिटीचे सीएमओ , पंकज तिवारी म्हणाले, “जग हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची कल्पना केवळ परवडणाऱ्या किमतींमुळेच नाही तर आरोग्यदायी जीवनमान आणि शाश्वत भविष्यासाठीही स्वीकारत आहे. आमच्या उत्पादनांसह, आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक चांगला, अधिक कार्यक्षम राइडिंग अनुभव प्रदान करताना हिरवी आणि स्वच्छ क्रांती आणू पाहत आहोत. इलेक्ट्रिक सायकली जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक वाहतुकीच्या कल्पनेत क्रांती घडवत आहेत आणि आम्ही भारतासाठी या प्रवासाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहोत.”
या वर्षाच्या सुरुवातीला, नेक्सझू मोबिलिटीने एक नवीन सुपर लाँग रेंज गाडी, रोडलार्क इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली.जी एका चार्जवर १०० किमी पर्यंत धावू शकते. नेक्सझूने डिझाइन केलेले हे वाहन एका नवीन हलक्या स्टीलच्या फ्रेमवर बनवले आहे. जे होम सॉकेटवर चार्ज करता येते. या वाहनाची बॅटरी तीन ते चार तासांत चार्ज होऊ शकते.