मुक्तपीठ टीम
तरुणाईचे आवडते सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून आता कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचे नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत. फेसबुक-इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांना कमाई करता येणार आहे. फेसबुक-इंस्टाग्राम चालवणाऱ्या मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी कमाई कशी करायची त्याची पद्धतही सांगितल्या आहेत.
पैसे कमवण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करायचा असेल तर ही एक आनंदाची बातमी आहे. मार्क झुकरबर्गन यांनी कन्टेंट क्रिएटर्सना दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैसे कमविण्याचे नवीन मार्ग दाखवले आहेत. यामध्ये इंटरऑपरेबल सबस्क्रिप्शन, मोनेटायझिंग रील्स, डिजिटल कलेक्टिबल्स, क्रिएटर मार्केटप्लेस, फेसबुक स्टार्स आणि इतरांमधील इंटरऑपरेबल सब्सक्रिप्शन यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ही फिचर्स क्रिएटर्सला मेटाव्हर्स तयार करण्यात मदत करतील, असेही झुकरबर्ग म्हणाले.
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर येणारे नवीन फिचर्स:
१. इंटरऑपरेबल सबस्क्रिप्शन:
हे फिचर क्रिएटर्सला त्यांच्या पेड सब्सक्राइबर्सना इतर प्लॅटफॉर्मवर सब्सक्राइबर-ओन्ली फेसबुक ग्रुप्सपर्यंत प्रवेश प्रदान करेल.
२. फेसबुक स्टार्स:
झुकेरबर्गने असेही सांगितले की कंपनी स्टार्स नावाचे त्यांचे टिपिंग फिचर सर्व पात्र निर्मात्यांसाठी उघडत आहे जेणेकरून अधिक लोक त्यांच्या रील, थेट किंवा व्हीओडी व्हिडिओंमधून कमाई करण्यास सुरवात करू शकतील.
३. मोनेटायझिंग रील्स:
याव्यतिरिक्त, कंपनी फेसबुकवर क्रिएटर्ससाठी रील्स प्ले बोनस प्रोग्राम उघडत आहे, ज्यामुळे क्रिएटर्सना त्यांच्या इंस्टाग्राम रील्स फेसबुकवर क्रॉस-पोस्ट करण्याची आणि कमाई करण्याची सुविधा मिळेल.
४. क्रिएटर मार्केटप्लेस:
मार्क झुकरबर्ग म्हणाले की कंपनीने इंस्टाग्रामवर अशा ठिकाणांची चाचणी सुरू केली आहे जिथे क्रिएटर्सना शोधले जाऊ शकते आणि पैसे दिले जाऊ शकतात.
५. डिजिटल कलेक्टिबल्स:
कंपनी अधिक क्रिएटर्सना इंस्टाग्रामवर एनएफटी डिस्प्लेसाठी समर्थन करत आहे. “आम्ही हे फिचर्स लवकरच फेसबुकवर आणणार आहोत. लोक इंस्टाग्राम आणि फेसबुकवर क्रॉस-पोस्ट करू शकतील. आम्ही लवकरच स्पार्करसह इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये एनएफटीची चाचणी देखील करणार आहोत. असे झुकरबर्गने एका पोस्टमध्ये लिहिले.”
६. रेव्हेन्यू शेअरिंग बंद केल्याची घोषणा
फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये रेव्हेन्यू शेअरिगं बंद करत असल्याचं म्हटलं आहे. २०२४पर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कोणत्याही रेव्हेन्यू शेयरिंगवर बंदी घातली जाईल. यामध्ये पेड ऑनलाइन इव्हेंट, सब्सक्रिप्शन, बॅज आणि बुलेटिन यांचा समावेश आहे.