Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

असं झालंच कसं? म्हैशींच्या धडकेनं नव्या कोऱ्या वंदे भारत ट्रेनच्या समोरची बाजू तुटली!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
वंदे भारत ट्रेन अपघात

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान मोदींनी नुकताच हिरवा झेंडा दाखवत काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं उद्घाटन केलं होतं. या अत्याधुनिक आणि सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनने मुंबईहून अहमदाबादला जात असताना म्हैशींच्या कळपाला धडक मारली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या हायस्पीड ट्रेनचा पुढील अर्धा भाग तुटला आहे आणि इंजिनचे नुकसान झाले आहे. हा ट्रेन अपघात मुंबईहून अहमदाबादला जात असताना वातवा आणि मणिनगर स्टेशनदरम्यान घडला आहे. या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

अपघातानंतर २० मिनिटं ट्रेन थांबवली!

  • मुंबईकडून अहमदाबादला येणाऱ्या ट्रेनचा सकाळी ११.१८ मिनिटांनी अपघात झाला.
  • अपघातानंतर वंदे भारत ट्रेन सुमारे २० मिनिटे थांबवावी लागली. यानंतर ट्रेनच्या तुटलेल्या भागाची दुरुस्ती केल्यानंतर ती अहमदाबादकडे रवाना झाली.
  • सकाळी ११.१५ वाजता अचानक म्हैशींचा कळप रेल्वे ट्रॅकवर आला आणि ही जोरदार धडक झाली.
  • याबाबत, अहमदाबाद रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जितेंद्र जयंत यांनी ही माहिती दिली.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भारतीय रेल्वेची भारतातील तिसरी हाय-स्पीड ट्रेन आहे. यापूर्वी, नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली-माता वैष्णो देवी कटरा दरम्यान दोन हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे संचालन सुरू करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींनी ३० सप्टेंबर रोजी उद्घाटन केले

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यात गांधीनगर ते मुंबई दरम्यानच्या हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
  • पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची पाहणी केली आणि उपलब्ध सुविधांचाही आढावा घेतला.
  • ट्रेनच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या कंट्रोल सेंटरचीही त्यांनी पाहणी केली.
  • वंदे भारत ट्रेन यशस्वी करण्यासाठी कष्ट करणाऱ्या कामगार, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला होता.

भारतात ४०० पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन चालवल्या जाणार

  • भारतीय रेल्वे देशभरात ४००पेक्षा जास्त सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे.
  • हायस्पीड ट्रेनमध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, स्वयंचलित सरकते दरवाजे आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन पुश बटणे आहेत.
  • केंद्र सरकारने मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत ट्रेनचे सुमारे १६०० डबे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags: High-Speed ​​Vande Bharat TrainmuktpeethMumbai-AhmedabadVande Bharat Express TrainVande Bharat Train Accidentघडलं-बिघडलंमुक्तपीठमुंबई-अहमदाबादवंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवंदे भारत ट्रेन अपघातहाय-स्पीड वंदे भारत ट्रेन
Previous Post

राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post
pne_dio news Adhyapak vikas sanstha baithak_6 oct 2022-6

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!