मुक्तपीठ टीम
इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने (आयओसी) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सिलिंडर बाजारात आणला आहे. त्यास कंपोझिट सिलिंडर असे नाव दिले गेले आहे. आयओसीचे म्हणणे आहे की, स्मार्ट किचनकडे पाहता हा स्मार्ट सिलिंडर तयार करण्यात आला आहे. इंडेन कंपोझिट सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला गॅस किती शिल्लक आहे आणि किती खर्च झाला हे ही कळते.
कंपोझिट सिलिंडरचे काय आहेत फायदे?
• ते सामान्य सिलिंडर्सपेक्षा खूप हलके असतात. स्टील सिलिंडरच्या तुलनेत याचे वजन निम्मे असते.
• सिलिंडरचा काही भाग पारदर्शक आहे, जेणेकरून सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे हे सहजपणे समजेल.
• कंपोझिट सिलिंडर गंजत नाही आणि त्याचे लादीवर डागही उटत नाहीत.
सामान्य सिलिंडरपेक्षा मजबूत आणि सुरक्षित
• इंडेन कंपोझिट सिलिंडर सामान्य सिलिंडरपेक्षा अधिक मजबूत आणि सुरक्षित आहे.
• हे तीन थरांनी बनलेले आहे. हे ब्लो-मोल्डेड हाय डेन्सिटी पॉलीइथायलीन (एचडीपीई) इनर लाइनरपासून बनलेले आहे.
• जे पॉलिमर-रॅप्ड फायबरग्लासच्या थराने झाकलेले आहे.
• यात एचडीपीई बाह्य जॅकेट बसवले आहे.
जुना सिलिंडर देऊन करता येते बदली
• साधा सिलिंडर देऊन कंपोझिट सिलिंडर घेता येतो.
• परंतु यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट द्यावे लागेल.
• १० किलो सिलिंडरची सुरक्षा ठेव ३,३५० रुपये, तर ५ किलो सिलिंडरसाठी सुरक्षा ठेव २१५० रुपये आहे. सामान्य सिलिंडर्सप्रमाणेच हा सिलिंडरही घरपोच केला जातो.
• सध्याचे स्मार्ट किचन लक्षात घेऊन हे सिलिंडर तयार केले गेले आहेत.
• कंपोझिट सिलिंडर्स सध्या दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, फरीदाबाद आणि लुधियानामध्ये निवडक वितरकांसह उपलब्ध आहेत.
• हे ५ किलो आणि १० किलो आकारात उपलब्ध आहेत.