मुक्तपीठ टीम
भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. गोवा पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गोवा पोलिसांचे आयजी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी पत्रकार परिषद घेत हा गौप्यस्फोट केला आहे. सोनालीचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना अटक करण्यात आली आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सुधीर सांगवान आणि त्याचा सहकारी सुखविंदर सिंग सोनालीसोबत एका क्लबमध्ये पार्टी करत असल्याचे दिसून आले. सुशांत सिंह राजपुत या अभिनेत्याच्या आत्महत्याने महाराष्ट्रात नव्हे तर देशात गदारोळ माजवला गेला होता, पण गोव्यात इतकं सारं होऊनही सारं कसं शांत शांत आहे. माध्यमंही सरकारबद्दल काही बोलत नाही, हे धक्कादायक मानलं जात आहे.
नेमकं काय झालं?
- चौकशीदरम्यान सुखविंदर आणि सुधीर यांनी कबुली दिली की, त्यांनी सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स दिले.
- त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.
- आरोपी त्यांना शौचालयात घेऊन गेले.
- तिथे दोन तास त्यांनी काय केलं? याचं उत्तर आरोपींनी दिलेलं नाही.
- आम्ही सीसीटिव्ही फुटेज पाहिले आणि दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
सोनाली फोगाटांचा मृत्यू संशयास्पद!!
- सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यू मागे मोठे कारस्थान असल्याचे पाहिलं जात आहे.
- सोनाली फोगट यांचा उत्तर गोव्याच्या अंजुनामधील सेंट अँन्थोनी रुग्णालयात २३ ऑगस्टला मृत्यू झाला होता.
- कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाबाबत संशय व्यक्त केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
- शवविच्छेदन अहवालात फोगट यांच्या शरिरावर जखमा आढळून आल्या होत्या.
- फोगट यांच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वांकष तपास करण्यात येत आहे.
- दरम्यान, फोगट यांच्यावर मृत्यूपूर्वी बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
- या आरोपांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
- संपत्ती बळकावण्यासाठी आणि राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी हत्या करण्यात आल्याचा आरोप सोनालीचे भाऊ रिंकू ढाका यांनी केला आहे.
- त्यांच्या मृत्यूच्या काही तासांनंतर, सोनालीसोबत काम करणारा त्यांचा संगणक ऑपरेटर संशयास्पद परिस्थितीतून पळून गेला.
- ऑपरेटरने लॅपटॉपही सोबत नेला.
- घराचा डीव्हीआरही गायब असल्याचे आढळून आले. कपाटात ठेवलेली कागदपत्रेही सापडली नाहीत.