मुक्तपीठ टीम
एटीएममुळे खात्यातून पैसे काढणे सोपे आहे. पण अनेकदा एटीएममधून पैसे काढतांना काही कारणांमुळे आपला व्यवहार रद्द होतो. मात्र, काही वेळा पैसे न मिळताही बँक खात्यामधून पैसे कापले जातात. आता मात्र पाच दिवसांच्या आत बँकेला ग्राहकांच्या तक्रारीचे निराकारण करावे लागेल. जर बँकेने वेळेत ग्राहकाच्या खात्यातून कापलेली रक्कम परत दिली नाही तर ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, बॅँकेला पाच दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करावे लागते. जर बॅँकेने तुमच्या खात्यातून डेबिट केलेली रक्कम परत केली नाही तर प्रतिदिन शंभर रूपये दराने भरपाई द्यावी लागेल. तरीही तुम्ही समाधानी नसल्यास https://cms.rbi.org.in वर तक्रार नोंदवू शकता.
आरबीआय चे हे नियम सर्व अधिकृत पेमेंट सिस्टीमवर देखील लागू आहेत. जसे की कार्ड ते कार्ड फंड ट्रान्सफर, पीओएस व्यवहार, आयएमपीएस व्यवहार, यूपीआय व्यवहार, कार्डलेस ई-कॉमर्स आणि मोबाईल अॅप व्यवहार आहेत. जर तुमच्यासोबत अस घडत असेल तर तुमचा ज्या बॅँकेत खाता आहे तिथे जाऊन तक्रार करा किंवा तुमच्या कस्टमर केअरला फोन करून तक्रार करू शकता.