मुक्तपीठ टीम
आयफोन हा जगभरातील लोकप्रिय ब्रँड आहे. प्रत्येकालाच तो हवाहवासा वाटतो. पण आयफोन घ्यायचा म्हटलं की अनेकदा फक्त कल्पना करून सोडून दिली जाते. कारण आयफोनची किंमत चांगलीच जास्त असते. तो घ्यायचा म्हटलं की बजेवर त्याचा भार पडतोच पडतो. आयफोनचे सर्वच मॉडेल इतर फोन पेक्षा महाग आहेत. परंतु आता आयफोनप्रेमींना किंमतीचा विचार न करता आयफोन घेता येणार आहे. आयफोन लवकरच खिशाला परवडणारे पहिले 5G मॉडेल लाँच करणार आहे.
२०२२ ला येणार ५जी आयफोन
- आयफोन एसईमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी असेल.
- यामध्ये ए१५ बायोनिक चीपसह उपलब्ध असेल.
- नवीन मॉडेलमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा चांगली कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी क्षमता असेल.
- या स्मार्टफोनमध्ये टच आयडी बटण आणि मोठ्या बेझलसह आयफोन एसइ (२०२०) सारखाच डिस्प्ले असेल अशी अपेक्षा केली जात आहे.
आयफोन एसईमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध असतील. नवीन मॉडेलमध्ये ५एनएम ए१५ बायोनिक चिपसेट उपलब्ध असेल. हे अँपल कंपनीचे पहिले परवडणारे ५जी मॉडेल असेल. २०२२च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये हे मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे.
मोठ्या डिस्प्लेसह आयफोन एसईवर देखील काम सुरु असल्याचे कंपनीकडुन सांगण्यात आले. आयफोन एसई (२०२२) ची रचना सध्याच्या आयफोन एसई (२०२०) मॉडेलसारखीच आहे, ज्याची रचना जुन्या आयफोन ८ सारखीच आहे. आयफोन एसई मॉडेलमध्ये ऍपलचे टच आयडी फिजिकल होम बटण, वरच्या आणि खालच्या बाजूला मोठे बेझल आणि ४.७-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. बाजार विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी नवीन मॉडेल बद्दल अंदाज वर्तवला आहे.