मुक्तपीठ टीम
स्मार्टफोन कितीही महागडा आणि हाय एन्ड असू द्या. पण नेटवर्कच नसेल तर कुचकामी ठरतो. तुम्ही म्हणाल वायफाय कॉल करता येतो ना. पण तेही सगळीकडे असतेच असे नाही. त्यामुळे अॅपलच्या नव्या आयफोन तेराची आतुरतेनं वाट पाहिली जात आहे. कारण हा स्मार्ट फोन सुपर स्मार्ट फोन ठरणाराय. मोबाइल, वायफाय असं कोणतंही नेटवर्क नसलं तरी या त्यानं कॉल आणि मॅसजिंग करता येईल.
लवकरच आयफोन १३ सीरीज लाँच होणार आहे. हा फोन सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत लाँच केला जाऊ शकतो. मात्र, लॉन्च होण्यापूर्वी फोनची अनेक वैशिष्ट्य उघड झाली आहेत. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे, आयफोन १३ ला लो अर्थ सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड (एलईओ) कनेक्टिव्हिटीसह येऊ शकतो. या इन-बिल्ट फिचरमुळे फोनमध्ये ४जी किंवा ५जी कनेक्टिव्हिटीशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग करता येते.
सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी असते कशी?
- एलईओ सॅटेलाइट हे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थित सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी असते.
- हे टॉवर कनेक्टिव्हिटी वापरत नाही.
- यामुळे तुमचा फोन थेट उपग्रहाशी जोडला जातो.
- ही व्यवस्था सध्या तरी महाग आणि मंद गतीने चालणारी आहे.
- त्यामुळे कंपन्या या दिशेने वेगाने काम करत आहेत.
- यामध्ये एलोन मस्क यांच्या उपग्रह इंटरनेट सेवेचे नाव स्टारलिंक दिसते.
स्मार्टफोन बनणार सॅटेलाइट फोन!
- आयफोन १३ मध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीसाठी क्वालकॉमची कस्टमाइझ एक्स ६० बेसबँड चिप वापरली जाऊ शकते.
- यामुळे आयफोन १३ यूजर्स फोनमध्ये ४ जी आणि ५जी कनेक्टिव्हिटीशिवाय संदेश आणि कॉल करू शकतील.
- सध्या अमेरिकन कम्युनिकेशन कंपनीद्वारे उपग्रह कनेक्टिव्हिटी सुविधा दिली जाते, जेणेकरून आगामी आयफोन १३ सीरीजचे स्मार्टफोन कनेक्ट केले जाऊ शकतील.
- सॅटेलाइट कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी सर्व्हिस अॅपलने ऑप्टिमाइझ केली आहे.
अॅपलव्यतिरिक्त लवकरच उपग्रह कनेक्टिव्हिटी इतर स्मार्टफोन कंपन्याही वापरू शकतात. त्यासाठी २०२२ मध्ये येणाऱ्या क्वालकॉमच्या एक्स ६५ बेसबँड चिपसेटची वाट पाहावी लागेल. त्यामुळे अॅपल उपग्रह कनेक्टिव्हिटी देणारा पहिला स्मार्टफोन ब्रँड बनू शकतो.