मुक्तपीठ टीम
मुंबईत कोरोना संसर्गाचं प्रमाण घटताना दिसत असलं तरी देशात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटची प्रकरणे सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयसीएमआरने कोरोना उपाचाराबाबत नवीन मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोनाच्या उपचारातून अनेक औषधे काढून टाकण्यात आली आहेत. यामध्ये ओरल अँटीव्हायरल, अँटीबायोटिक्स आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीज औषधांचा समावेश आहे. देशातील ३३ डॉक्टरांनी या औषधांच्या वापराविरोधात खुले पत्र लिहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसारनुसार आता ‘ही’ औषधे वापरू नका…
- अजिथ्रोमायसिन
- डॉक्सीसाइक्लिन
- हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन
- फॅविपिरावीर
- आयव्हरमेक्टिन
देशातील ३३ डॉक्टरांनी घेतले होते काही औषधांना आक्षेप!
- १४ जानेवारी रोजी ३३ डॉक्टरांनी एकत्र येत केंद्र सरकार, राज्ये आणि IMA यांना पत्र लिहून सांगितले की, अशी औषधे आणि चाचण्या बंद कराव्यात ज्या कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी आवश्यक नाहीत.
- औषध नियामक आणि ICMR यांच्यातील समन्वयाच्या अभावावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे.
- तसंच दुसऱ्या लाटेतही सरकारकडून जी चूक झाली, तीच चूक सरकारकडून होत असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलं होतं.
कोणते औषध, कधी?
- आयसीयूमध्ये जाण्याच्या ४८ तासांच्या आत टेसिलीजुमाब दिले जाऊ शकते.
- आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोना झाल्यानंतर किंवा आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर २४ ते ४८ तासांच्या आत टेसिलीजुमाब दिले जाऊ शकते.
सीटी स्कॅन कधी करायचं?
सीटी स्कॅन आणि महागड्या रक्त तपासणी अशा चाचण्या अत्यंत गंभीर रुग्णांमध्ये आणि जेव्हा जास्त आवश्यक असेल तेव्हाच कराच्या आहेत.
स्टेरॉइड्सचा अतिरेकी वापर टाळण्याचा सल्ला
आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार,स्टेरॉइड्स असलेली औषधे आधी किंवा जास्त डोसमध्ये किंवा जास्त काळ वापरल्यास काळ्या बुरशीसारख्या दुय्यम संसर्गाचा धोका वाढवतात.
आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांचे डोस
- कोरोनाच्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणांसाठी वेगवेगळ्या औषधांच्या डोसचा सल्ला देण्यात आला आहे.
- त्यात असे नमूद केले आहे की ०.५ ते ०१ मिग्रॅ/किग्राच्या दोन स्वतंत्र डोसमध्ये इंजेक्शन करण्यायोग्य मेथाप्रेडनिसोलोन किंवा डेक्सामेथासोनचा समतुल्य डोस पाच ते दहा दिवस सौम्य लक्षणे असलेल्या लोकांना दिला जाऊ शकतो.
- गंभीर प्रकरणांमध्ये १ ते २ mg/kg समान औषधाचे दोन स्वतंत्र डोस दिले जाऊ शकतात.