Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघर जिल्ह्यात ‘जिजाऊ’ संघटनेला सर्वात जास्त जागा! ५१ पैकी २० जागा जिजाऊला, तर शिवसेना १२!!

शिक्षण, आरोग्य प्रश्नांना सोडवण्यावर भर दिल्याचा फायदा - निलेश सांबरे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Palghar

मुक्तपीठ टीम

राज्यभरातून नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. त्यात पालघर जिल्ह्यातील निकाल हा लक्ष वेधून घेणारा आहे. तेथे सर्व प्रस्थापित पक्षांना मागे सारत निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील जिजाऊ संघटनेने मुसंडी मारली आहे. नगरपंचायतीच्या एकूण ५१ जागांपैकी सर्वाधिक २० जागी जिजाऊचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अन्य पक्ष हे एकआकडीच ठरलेत. त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या सर्वांचं लक्ष वेधलेल्या नगरपंचायतीत जिजाऊने १७ पैकी १६ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. मोखाडा, तलासरी या दोन नगरपंचायतींमध्येही जिजाऊने आपलं खातं उघडलं आहे.

jijau (1)

पालघर जिल्ह्यात ५१ जागांवरील निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ‘जिजाऊ’!

  • जिजाऊ – २०
  • शिवसेना – १२
  • भाजप – ०८
  • माकपा – ०६
  • राष्ट्रवादी – ०४
  • कॉंग्रेस – ०१

एकूण जागा – ५१

Palghar (2)

विक्रमगडमध्ये ‘जिजाऊ’ची एकहाती सत्ता!

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा आमदार आहेत. तरीही स्थानिक मतदारांनी तिथं १७ पैकी १६ जागांवर ‘जिजाऊ’च्या उमेदवारांना विजयी केले.

jijau (3)

विक्रमगडमधील मतदारसंघनिहाय निकाल:

  • प्रभाग क्र. २ – मनोज विलास वाघ
  • प्रभाग क्र. ३ – चंद्रशील अमोल भडांगे
  • प्रभाग क्र. ४ – निलेश रमेश पडवळे
  • प्रभाग क्र. ५ – जोत्स्ना योगेश माडी
  • प्रभाग क्र. ६ – जयश्री पांडुरंग महाला
  • प्रभाग क्र. ७- पुष्पा मोहन डंबाळी
  • प्रभाग क्र. ८ – भारती रमेश बांडे
  • प्रभाग क्र. ९ – माधुरी विष्णु सांबर
  • प्रभाग क्र. १० – वैशाली गणेश तामोरे
  • प्रभाग क्र. ११ – अमोल दिलीप भडांगे
  • प्रभाग क्र. १२ – विजय विठ्ठल मेघवाली
  • प्रभाग क्र. १३ – अर्चना श्याम लोहार
  • प्रभाग क्र. १४ – किर्ती सुरेश कुनोजा
  • प्रभाग क्र. १५ – अमित जान्या भावर
  • प्रभाग क्र. १६ – महेंद्र तुकाराम पाटील
  • प्रभाग क्र. १७ निमा अंकुश महाला

 

उगाच राजकारण करत न बसता, सामान्यांच्या शिक्षण, आरोग्य प्रश्नांना सोडवण्यावर भर दिल्याचा फायदा – निलेश सांबरे

nilesh sambare

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली १३ वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण या माध्यमातून जिजाऊचे कार्यकर्ते रात्रंदिवस काम सुरु असते. आम्ही फक्त निवडणुकींच्यावेळी लोकांजवळ जात नाही. त्यामुळे पालघरमध्ये मतदारांनी जिजाऊला सर्वात मोठा पक्ष बनवलं आहे. पण त्यामुळे आता जबाबदारी जास्त वाढली आहे. त्यातही जिथं सत्ता मिळाली त्या विक्रमगडमध्ये आम्हा खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. पण आम्ही विक्रमगडचा आणखी जास्त विकास आणि खऱ्या अर्थाने ते एक चांगले सर्व सुविधांनी सुसज्ज शहर व्हावे, त्याची आर्थिक भरभराट व्हावी, असे प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दिली.
तसेच तलासरी, मोखाडा येथे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून विकासकार्य कसे असते, विकासाचे जिजाऊ मॉडेल कसे आहे, तेही लोकांसमोर मांडू असंही त्यांनी सांगितले.


Tags: Jijau Educational and Social InstitutionsPalgharVikramgadजिजाऊ संघटनानगरपंचायत निवडणूकपालघरविक्रमगड
Previous Post

कोरोना उपचारासाठी नवी मार्गदर्शक तत्वं: कधी, कोणी, कोणती औषधं घ्यायची, कोणती टाळायची?

Next Post

मध्यप्रदेशातही व्यसनपोषक धोरण! दारू स्वस्त होणार, सर्वत्र मिळणार!

Next Post
Alcohol

मध्यप्रदेशातही व्यसनपोषक धोरण! दारू स्वस्त होणार, सर्वत्र मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!