Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाग्रस्त मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाईन्स: काय करायचं, काय नाही?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने कोरोनाग्रस्त लहान मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाइडलाईन्सनुसार लहान मुलांवर सीटी स्कॅनचा वापर योग्य तेव्हाच करावा आणि रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विस (DGHS) कडून जारी दिशा-निर्देशांमध्ये एसिम्पटॉमॅटिक आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर घातक असल्याचं म्हटले आहे. गाइडलाईनमध्ये सांगितल्यानुसार, १८पेक्षा कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिविरच्या वापराबाबत योग्य आकडेवारी नसल्यामुळे त्या इंजेक्शनच्या त्यांच्यासाठीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

 

मुलांसाठी सहा मिनिटांची वॉक टेस्ट

  • गाइडलाइंसमध्ये लहान मुलांसाठी ६ मिनिटांच्या वॉक टेस्टच्या सूचना देण्यात आला आहे.
  • वॉक टेट्सदरम्यान मुलांच्या बोटावर पल्स ऑक्सिमीटर लावून त्यांना सहा मिनिटे चालण्यास सांगावे.
  • यानंतर मुलांची ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल आणि पल्स रेट चेक करावा. यामुळे हॅप्पी हाइपोक्सियाची लक्षणे कळू शकतात.

 

काय आहे हॅप्पी हायपोक्सिया?

  • कोरोना महामारी आणि ब्लॅक फंगसदरम्यान हॅप्पी हायपोक्सियादेखील घातक ठरत आहे.
  • हा आजार डॉक्टरांसाठी नवे आव्हान बनला आहे.
  • या आजारात कोरोना लक्षणे आढळत नाहीत, पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.
  • हॅप्पी हायपोक्सियात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत.
  • रुग्ण स्वतःला निरोगी समजतो, पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होते.

 

स्टेरॉयडचा विचारपूर्वक वापर करण्याचा सल्ला

  • DGHS ने फक्त रुग्णालयांमध्ये भरती गंभीर रुग्णांना कडक देखरेखीखाली स्टेरॉयडच्या वापराचा सल्ला दिला आहे.
  • DGHS ने सांगितल्यानुसार, ‘स्टेरॉयडचा वापर योग्यवळी आणि योग्य प्रमाणात दिला जावा.
  • तसेच, रुग्णाने स्वतः स्टेरॉयडचा वापर टाळावा.

मुलांसाठीच्या इतर महत्वाच्या सूचना

  • लहान मुलांनी कायम मास्क घालावा.
  • हात स्वच्छ धुवावेत.
  • सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं
  • लहान मुलांना कायम पौष्टिक आहार द्यावा. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम राहील
  • सौम्य लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामोल (१०-१५एमजी)देता येऊ शकते
  • घशात खवखव किंवा खोकला आल्यावर मोठ्या मुलांनी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात

लहान मुलांना गंभीर संसर्गाचा धोका नाही

  • देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.
  • कोरोना रुग्णांची संख्या देशात सतत कमी होत आहे.
  • पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे.
  • यावर एम्सचे संचाल डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे.
  • लहाना मुलांना कोरोनाच्या लाटेचा गंभीर धोका असल्याचा डाटा जगात कुठेही उपलब्ध नाही आणि पुरावेही नाहीत, असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.

Tags: DGHSकेंद्र सरकारकेंद्रीय आरोग्य मंत्रालयडॉ. रणदीप गुलेरियाहॅप्पी हाइपोक्सिया
Previous Post

दुधापेक्षा पाणी महाग! बाटलीबंद पाण्यापेक्षा दुधाचा दर घसरल्याने सदाभाऊ खोतांचे मंत्रालयासमोर आंदोलन

Next Post

रामदेव बाबांचं शीर्षासन…डॉक्टरांना म्हणाले देवदूत! आता लसही घेणार!!

Next Post
ramdev baba

रामदेव बाबांचं शीर्षासन...डॉक्टरांना म्हणाले देवदूत! आता लसही घेणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!