मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप हे जगातील अब्जावधी यूजर्सचे सर्वाधिक लोकप्रिय आवडते मेसेजिंग अॅप आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवरील व्हॉइस मॅसेजमध्ये एकदा मेसेज जो रेकॉर्ड होईल तसाच पाठवता येत असे. पण आता मात्र मेसेज रेकॉर्ड होत असताना पाहिजे तेथे पॉझ करून पुन्हा रेकॉर्डची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे पाठवणाऱ्या यूजरला पाहिजे तोच व्हॉइस मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. त्यासाठी पूर्वीचे स्टॉपचे बटन हटवून तेथे व्हॉट्सअॅप व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये पॉझ आणि रिस्टार्ट बटणे आणण्यात आली आहेत. सध्या आयओएसवर असलेले हे फिचर लवकरच अँड्रॉइड यूजर्सनाही मिळेल.
व्हॉट्सअॅपवरील व्हॉइस मॅसेजमध्ये उपयोगी बदल
- मेटा कंपनीच्या व्हॉट्सअॅपशी टेलीग्रामची स्पर्धा आहे.
- टेलीग्राम काही वैशिष्ट्यांच्याबाबतीत व्हॉट्सअॅपपेक्षाही खूप पुढे आहे.
- त्यामुळे मेटा आपल्या मेसेंजिंग प्लॅटफॉर्म सेवेत सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप बद्दल एक मोठे अपडेट आले आहे.
- बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपवर नवीन फिचर आले आहे.
- आता यूजर्सना व्हॉइस मॅसेज थांबवता येतात, तसेच पुन्हा सुरू करता येतात.
व्हॉट्सअॅप व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये पॉझ आणि रिस्टार्ट बटणे
- व्हॉट्सअॅपच्या आयओएस यूजर्ससाठी सध्या हे नवीन फिचर उपलब्ध असेल.
- त्याचा वापर करून व्हॉइस मॅसेज थांबवता येतात किंवा पुन्हा सुरू करता येतात.
- व्हॉट्सअॅपच्या आयओएस एडिशन २२.५.७५मध्ये आता वॉइस संदेश रेकॉर्ड करताना त्याला पॉझ करण्याची सोय आहे.
- पूर्वीचे स्टॉप बटण काढून टाकण्यात आले आहे.
- स्टॉपच्याजागी पॉझ आणि रिस्टार्ट ही बटणे आली आहेत.
अँड्रॉइडवरही हे फिचर लवकरच
- व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मॅसेज रेकॉर्डिंगला पॉझ करणारे हे वैशिष्ट्य गेल्यावर्षी पहिल्यांदा दिसले होते.
- हे वैशिष्ट्य आतापर्यंत व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आले नव्हते.
- हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी लवकरच आणले जाईल