मुक्तपीठ टीम
पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर या महिन्यात आणखी चार एस्केलेटर आणि लिफ्ट सुरू होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई विभागातील विविध स्थानकांवर चार नवीन एस्केलेटर आणि पाच नवीन लिफ्ट सुरू केल्या आहेत. नवीन एस्केलेटर आणि लिफ्ट्स अलीकडेच सार्वजनिक सेवेत वापरल्या जात आहेत. प. रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा उभारल्या जात आहेत. चार नवीन एस्केलेटरपैकी, मुंबई सेंट्रल स्थानकात उत्तर आणि दक्षिण कडील “लँडिंग” कडे दोन कार्यन्वित झाले आहेत. फलाट क्र. ४ वर मरीन लाइन्स स्टेशनमधील एफओबीशी जोडणारा आणि दुसरा दक्षिण एफओबीशी जोडलेला फलाट क्र.१ वर बसवण्यात आला आहे. हे एस्केलेटर या महिन्यात जानेवारीत कार्यान्वित झाले. या आर्थिक वर्षात आणखी १४ एस्केलेटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक एस्केलेटर बसविण्यासाठी १ कोटी रुपये खर्च आहे. मुंबई उपनगरी क्षेत्रात बोरिवली आणि जोगेश्वरी स्थानकांमध्ये आणखी दोन एस्केलेटर जानेवारीच्या अखेरीस कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, असे प.रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले .
प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटरसोबतच मुंबईच्या विविध उपनगरीय स्थानकांवर पाच नवीन लिफ्टही सुरू करण्यात आल्या आहेत. या लिफ्ट माटुंगा रोड स्थानकावरील दक्षिण एफओबीशी जोडलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक १/२ वर, दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ५ वर दोन लिफ्ट, कांदिवली स्थानकाच्या मध्य एफओबीवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि प्लॅटफॉर्मवर एक लिफ्ट लावण्यात आल्या आहेत. मीरा रोड स्थानकावरील ‘उत्तर एफओबी’ वरही लिफ्ट बसवण्यात आली. यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये खर्च आला. मुंबई उपनगरीय विभागात कांदिवली आणि गोरेगाव स्थानकांवर आणखी दोन लिफ्ट जानेवारी २०२२ च्या अखेरीस कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.