Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई ते नवी मुंबई निसर्गरम्य पर्यावरणपूरक प्रवास…रस्ते-रेल्वेही भारमुक्त!

सिडको उपाध्यक्ष डॉ. संजय मुखर्जींकडून नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Nerul Jetty

मुक्तपीठ टीम

केंद्र शासनाच्या अंतर्गत जलवाहतूक विकास धोरणांतर्गत महाराष्ट्र शासनाने मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर अंतर्गत जलवाहतूकीच्या नियोजन आणि अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र सागरी मंडळाची (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) नियुक्ती केली आहे. या अंतर्गत मुंबईतील भाऊचा धक्का, नवी मुंबईतील नेरूळ आणि अलिबाग जवळील मांडवा येथे अनुक्रमे मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिडको आणि महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जलवाहतूकीकरिता पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. यानुसार सिडकोकडून नेरूळ येथे जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत आहे.

 

त्यामुळे लवकरच रायगड, नवी मुंबईतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी पर्यावरणपूरक प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच नेहमीच्या रेल्वे आणि रस्तेमार्गांवरील प्रवासाचा भारही कमी झाल्याने त्या मार्गाने प्रवास करणाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

Nerul Jetty

मुंबई ते नवी मुंबई निसर्गरम्य पर्यावरणपूरक प्रवास…रस्ते-रेल्वेही भारमुक्त!

  • नेरूळ जलवाहतूक टर्मिनल येथून बोट सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळणार.
  • प्रवासात निसर्गरम्य सागरी प्रदेशाचे अवलोकन करण्याची संधी मिळणार आहे.
  • नेरूळ ते भाऊचा धक्का हे ११ सागरी मैलाचे अंतर स्पीड बोट व कॅटमरानद्वारे केवळ ३० ते ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
  • नवी मुंबई, दक्षिण मुंबई व पुढे अलिबाग पर्यंतच्या प्रवासाच्या वेळतही लक्षणीयरीत्या बचत होणार आहे.
  • जलवाहतूकीमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या रस्ते व रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्येचा भारही कमी होण्यास मदत होणार आहे.

 

कसे आणि कुठे असणार पर्यावरणपूरक प्रवासासाठीचे जलवाहतूक टर्मिनल?

  • सदर जलवाहतूक टर्मिनल हे एनआरआय संकुलाच्या पूर्वेस, नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पश्चिमेस असून उत्तरेकडून पाम बीच मार्गाद्वारे त्यास संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभली आहे. नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर स्पीड बोट/कॅटमरान सेवेचे परिचालन महाराष्ट्र सागरी मंडळाकडून करण्यात येणार आहे.
  • सदर जल वाहतूक टर्मिनल हे पनवेल खाडीमध्ये स्थूणाधारित फलाटावर (पाईल्ड् प्लॅटफॉर्म) उभारणे प्रस्तावित आहे.
  • पोच मार्ग (ॲप्रोच रोड), पोच धक्का (ॲप्रोच जेट्टी), टर्निंग प्लॅटफॉर्म, तरंगता तराफा (फ्लोटिंग पॉन्टून), लिंक स्पॅन, ब्रिदींग डॉल्फिन्स, इलेक्ट्रिक पॅनल रूम, पाण्याच्या टाक्या, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, नेव्हिगेशन एरिया, मार्शलिंग एरिया इ. सुविधाही पाईल्ड् प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात येणार आहेत.
  • टर्मिनल अंतर्गत प्रतीक्षालय, रिफ्रेशमेन्ट एरिया, किचन व फुड काउन्टर, तिकीट काउन्टर, लगेज चेकिंग एरिया, स्वच्छतागृहे, बहुउद्देशीय सभागृह, फुड कोर्ट इ. सुविधाही समाविष्ट आहेत.

Nerul Jetty

डॉ. संजय मुखर्जींकडून नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकतीच नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रकल्पाशी संबंधित कामांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी प्रकल्पाची अंमलबजवाणी आणि येत असलेल्या अडचणीं संदर्भात चर्चा केली.

 

“पूर्व किनारा जलवाहतूक प्रकल्पांतर्गत नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत असून या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच येथून प्रवाशांकरिता बोट आणि कॅटमरान सेवा सुरू होणार आहे. यामुळे रस्ते व रेल्वे मार्गांवरील ताण कमी होण्याबरोबरच नवी मुंबईकरांना मुंबईला जाण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे,” असे डॉ. संजय मुखर्जीं यांनी सांगितले.

 


Tags: CIDCOeco-friendly travelmumbaisanjay mukharjiजलवाहतूक टर्मिनलडॉ. संजय मुखर्जीमुंबई - नवी मुंबई
Previous Post

‘चाचा चौधरी’ नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर! उगवत्या पिढीत नद्यांविषयी जागृतीचा प्रयत्न

Next Post

“आरक्षणामुळे अनाथांच्या भविष्याची वाट सोपी”!

Next Post
अनाथांच्या

"आरक्षणामुळे अनाथांच्या भविष्याची वाट सोपी"!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!