Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त नव्या नाण्यांची मालिका!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
amrut mahotsav

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. सरकारकडून याला आणखी संस्मरणीय बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त नव्या नाण्यांची शृंखला जारी करण्यात येणार आहे. म्हणजेच नाण्यांच्या माध्यमातून अमृत महोत्सवीवर्ष अधिक संस्मरणीय केले जाणार आहे. भारत सरकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित १ रुपया ते २० रुपयांच्या नाण्यांची नवीन मालिका जारी करणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने त्याची अधिसूचना जारी केली आहे.

 

१,२,५,१० आणि २० रूपयांची नाणी

  • अधिसूचनेनुसार, चलनात असलेल्या नाण्यांची १, २, ५, १० आणि २० रुपयांची किंमत असेल.
  • १ ते १० रुपयांची नाणी गोलाकार असतील आणि २० रुपयांची नाणी पॉलिहेड्रल (१२ कडांचा बहुभुज) असेल.
  • पाच नाण्यांच्या एका बाजूला ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या अधिकृत लोगोचे चित्र असेल.
  • त्याच्याखाली नाण्याचे मूल्य लिहिले जाईल.
  • परिघाच्या वरच्या भागावर स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष लिहिलेले असेल.
  • सर्व नाण्यांवर दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचे चिन्ह असेल, डाव्या बाजूला भारत आणि उजवीकडे ‘सुधारित’ लिहिलेले असेल.

 

एक आणि दोन रुपयांची नाणी स्टेनलेस स्टीलची असतील तर ५, १० आणि २० रुपयांची नाणी मिश्र धातूची (निकेल, तांबे आणि जस्त) असतील. २० मिलिमीटर (मिमी) व्यासाच्या १ रुपयाच्या नाण्याचे वजन ३.९ ग्रॅम, २३ मिमीच्या २ रुपयांच्या नाण्याचे वजन ४.७ ग्रॅम, २५ मिमीच्या ५ रुपयांच्या नाण्याचे वजन ६.७४ ग्रॅम, २७ मिमी १० रुपयांचे नाणे ७.७२ ग्रॅम वजनाचे आहे. २० रुपयांचे नाणे ८.५४ ग्रॅम वजनाचे असेल. नाण्यांवर टांकसाळीचे वर्षही लिहिले जाईल.

 

भारत सरकार ही नाणी चलनात आणणार की अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ म्हणून ठेवणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नाण्यांचा अभ्यास करणारे सुधीर लुणावत यांनी सांगितले की, “सरकार नोटिफिकेशनमध्ये नाण्यांच्या चलनाची माहिती देते. सरकारने सुमारे तीन वर्षांपूर्वी नाण्यांची नवीन मालिका जारी केली होती, त्यानंतर अधिसूचनेत त्यांच्या चलनाबाबतही माहिती देण्यात आली होती. यावेळी याबाबत अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलेले नाही.”


Tags: celebrate independent's 75 yearsIndiamuktpeethnew coins seriespmo narendra modiनव्या नाण्यांची मालिकापंतप्रधान नरेंद्र मोदीभारतभारत सरकारमुक्तपीठस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव
Previous Post

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? जाणून घ्या कारणं, बदला ‘या’ सवयी…

Next Post

मुंबईकर कर्णबधीर क्रिकेटपटू कृष्णा गौडाची नेत्रदीपक कामगिरी!

Next Post
mumbaikar deaf divyang krishna gauda great performance

मुंबईकर कर्णबधीर क्रिकेटपटू कृष्णा गौडाची नेत्रदीपक कामगिरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!