Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मागास जाती ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार! मराठा समाजालाही फायदा होण्याची शक्यता!!

मराठा समाजासह अनेक जातींच्या आरक्षणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vidhan bhavan

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी दिलेल्या निकालामुळे मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार केंद्राने राज्यांकडून काढून घेतल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, आता केंद्र सरकार मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचे राज्यांना दिलेले अधिकार त्यांना पुन्हा देण्यासाठी कायदा करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी १०२व्या घटनादुरुस्तीत आवश्यक ते बदल केले जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात संसदेत याबद्दलचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मराठा समाजासह देशभरातील अनेक जातींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

 

राज्यांना अधिकार पुन्हा देण्यासाठी कायद्याचा मार्ग

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
  • न्यायालयाने १०२व्या घटनादुरुस्तीनंतर झालेल्या बदलांवर भाष्य केले.
  • राज्यांना सामाजिक आणि आर्थिक आधारावर मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार नाही.
  • अशी यादी फक्त केंद्रच बनवू शकते.
  • तीच यादी वैध असेल.
  • न्यायालयाच्या या निर्णयानंतर एक नवा वाद निर्माण झाला होता.

 

आरक्षण ठरवण्याच्या अधिकारांचा वाद

  • सध्या केंद्र आणि राज्यांमधील ओबीसींची यादी वेगळी आहे.
  • अशा अनेक जातींना राज्यांच्या यादीत ठेवण्यात आले आहे, जे केंद्रीय यादीत नाहीत.
  • केंद्र आरक्षणाबाबत संवेदनशील आहे, कारण याबद्दल कोणताही निर्णय समाजात असंतोष माजवू शकतो.
  • कारण राज्यांच्या यादीच्या आधारे अशा अनेक मागास जाती आहेत, ज्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत आहे आणि राज्यातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.
  • अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीमुळे या जातींचे नुकसान होऊ शकते.
  • आरक्षणासारख्या संवेदनशील प्रकरणात केंद्र सरकार कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही.
  • हेच कारण आहे की सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच हे स्पष्ट केले होते की ते त्याच्याशी सहमत नाही.
  • राज्यांना त्यांचे मागास जाती ठरवण्याचे अधिकार परत देण्यात येतील.

 

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आता कायद्याचा तोडगा

  • केंद्र सरकारने मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण अधिकार राज्यांना नसल्याच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिकाही दाखल केली होती.
  • ती न्यायालयाने फेटाळली.
  • यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.
  • सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवीन मंत्री वीरेंद्र कुमार यांनी आधी अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली.
  • वीरेंद्रकुमारांनी त्यानंतर कायदेतज्ज्ञ सल्लामसलत केली.
  • पंतप्रधानांची मंजुरी घेतल्यानंतर १०२ व्या घटनादुरुस्तीतील सुधारणांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
  • सध्या ओबीसींच्या केंद्रीय यादीमध्ये सुमारे २६०० जातींचा समावेश आहे.
  • या सुधारणांनंतर आणखी काही जातींचा समावेश करण्याचा मार्ग मोकळा होईल.

Tags: 102th constitutional amendment१०२वी घटनादुरुस्तीMaratha Reservationprime minister narendra modiकेंद्र सरकारमराठा आरक्षणवीरेंद्र कुमारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

केंद्रीय विद्यालयांच्या प्रवेशांमधील खासदारांचा १० जागांचा कोटा रद्द!

Next Post

तलवार घेऊन न्यूज चॅनल कार्यालयात तरुण घुसला, प्रचंड तोडफोड

Next Post
stanger

तलवार घेऊन न्यूज चॅनल कार्यालयात तरुण घुसला, प्रचंड तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!