मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे जगभरात व्यवसायांचं नुकसान होत असताना आयटी सेक्टरची कामगिरी मात्र फायद्याची ठरली आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोसारख्या आयटी कंपन्यांना १७ हजार ४४६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. या कंपन्यांचे मार्च २०२१ ते एप्रिल २०२२ या चालू आर्थिक वर्षात १ लाख ५ हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याचे नियोजन आहे.
कोणत्या कंपनीला किती नफा?
- जूनमधील तिमाहीत या उद्योगातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने ९ हजार कोटींचा नफा कमावला आहे.
- तर त्या पाठोपाठ इन्फोसिसनं ५,१९५ कोटी रुपये नफा मिळवला आहे.
- जो कंपनीच्या गेल्या १० वर्षातील सर्वात मोठा नफा आहे.
- गुरुवारी विप्रोनेही नफा जाहीर केला आहे.
- कंपनीला ३,२४३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
आयटी कंपन्यांमधील करिअर संधी
- आयटी कंपन्यांना अनेक मोठी कामं मिळाल्याने या कंपन्या मोठ्या प्रमाणावर पदभरती करणार आहेत.
- टीसीएसने ४० हजार जागा तर इन्फोसिसने ३५ हजार जागा भरण्याचं निश्चित केलं आहे.
- तर आता विप्रो ही लवकरच रोजगाराच्या संधी उपल्बध करेल, अशी माहिती मिळाली आहे.
- जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ६ हजार आयटी व्यावसायिकांना नोकरी दिली जाईल.
- २०२१-२२ मध्ये ३० हजार फ्रेशर्सला जॉब देण्याचे लक्ष्य आहे.
वर्क फ्रॉम होममुळे वाढले काम
- कोरोनामुळे, कॉर्पोरेट्समध्येमध्ये वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन एज्यूकेशनमुळे आयटी कंपन्यांच्या व्यवसाय वाढीला फायदा झाला आहे.
- परिणामी कंपन्यांना मोठ्या डील मिळाल्या आहेत.
- इन्फोसिसला जून तिमाहीत १९,३८१ कोटी आणि टीसीएसला ६०,३८१ कोटी रुपयांचे काम मिळाले.
- याशिवाय विप्रोलाही ५,३२५ कोटी रुपयांचे नवीन काम मिळाले आहे.