मुक्तपीठ टीम
विविध उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशपदी ८ न्यायमूर्तींना शनिवारी नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर पाच मुख्य न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांत बदली करण्यात आली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारताच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर या ८ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीश केले, तर ५ मुख्य न्यायमूर्तींची बदली केली.
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती
- कोलकाता उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांना अलाहबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात आली.
- मेघालय उच्च न्यायालयातील न्या. रणजित मोरे यांना त्याच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात आली आहे.
- कर्नाटक उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा यांना तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात आली.
- मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्या. प्रकाश श्रीवास्तव यांना कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले आहे.
- हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आर. व्ही. माळीमठ आता मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे नेतृत्व करतील.
- अलाहबाद उच्च न्यायालयाचे न्या. रितुराज अवस्थी कर्नाटक उच्च न्यायालयात, तर कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. अरविंदकुमार यांना गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात आली.
- छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्या. प्रशांतकुमार मिश्रा आता आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे नेतृत्व करतील.
५ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींची बदली
- राष्ट्रपतींनी ५ मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्याही केल्या आहेत.
- त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. ए. कुरेशी यांची बदली राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी करण्यात आली. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती आता त्रिपुराचे मुख्य न्यायाधीश असतील.
- मध्य प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती मोहम्मद रफिक यांना हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश, मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विश्वनाथ समद्दार यांना सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए के गोस्वामी यांना छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले आहे.